27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयअमित शहानंतर उदय सामंतांची अयोध्यावारी ऑफर

अमित शहानंतर उदय सामंतांची अयोध्यावारी ऑफर

देशात आगामी लोकसभा निवडणुका (Lok sabha Election) सुरू होण्यापूर्वी राम मंदिर वारीच्या ऑफर भाजप करत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप नेते अमित शाहांनी (Amit Shaha) मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा, भाजप सरकार राज्यातील सर्वांना राम मंदिराचे दर्शन घडवेल, असे शहांनी वक्तव्य केले होते. यावर अनेकदा विरोधकांनी राममंदिर आणि निवडणुकीवरुन सडकून टीका केली. निवडणूक आयोगाला काही आचारसंहिता आहे की नाही, असा सवाल विरोधी पक्षांमधून केला जात होता. आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी (Uday Samant) राज्यातील जनतेला राम मंदिर पाहण्यासाठी ऑफर दिली आहे. राम मंदिर महाराष्ट्रातील लोकांना पाहायचे असेल तर सरकार आणि शिवसेना त्याची व्यवस्था करेल, असे उदय सामंत म्हणाले.

काय म्हणाले सामंत

अमित शहांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात एका सभेत भाजप सरकारला निवडूण आणा आणि आयोध्यावारी करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात उद्या सामंतांनी देखील आपल्या मतदारसंघात आयोध्यावारीची ऑफर दिली आहे. सामंत म्हणाले की, राम मंदिर होत नव्हतं, मात्र आता राम मंदिर झाले आहे तर माझ्या मतदारसंघातील मतदारांना जायचे असेल तर माझी जबाबदारी आहे. माझ्या मतदारसंघातील मतदार जाऊ शकतो का? जर मी हे केलं तर पाप काय? असे सामंत म्हणाले आहेत. तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आयोध्यावारी सरकार करु शकते असे ते म्हणाले आहेत.

हे फक्त माझ्या मतदारसंघापूरते मर्यादित नाही. येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून राम मंदिराबाबत निर्णय घेतील. राम मंदिर ही हिंदुस्थानची अस्मिता आहे. यात कमीपणा असण्याचे कारण नाही. मी माझ्या मतदारसंघापासून सुरूवात करेल.

हे ही वाचा

‘सत्तर वर्षे मराठ्यांचे वाटोळं कोणी केलं’? मनोज जरांगेंचा कडवट सवाल

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

‘भुजबळ मंत्री असून कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही’

काही दिवसांआधी अमित शहांनी असे वक्तव्य केले होते तेव्हा त्यांच्यावर निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोग कारवाई का करत नाही? तसेच धार्मिक भावनेतून मत मागण्यासाठी मतदारांचा वापर केला जात असल्याचा विरोधकांनी भाजप आणि अमित शहांवर हल्ला केला आहे.

काय म्हणाले होते अमित शहा

मध्य प्रदेसआत काही दिवसांआधी विधानसभा निवडूक झाली. या निवडणुकीला संबोधित करुन अमित शहांनी मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी येथे मतदारांना मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आणा, राज्यातील सर्वांना राम मंदिराचे एकेक करत दर्शन घडवून आणू, असे अमित शहा म्हणाले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी