31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeआरोग्यदेशात डेंग्यूचं सावट; राज्य तिसऱ्या क्रमांकावर

देशात डेंग्यूचं सावट; राज्य तिसऱ्या क्रमांकावर

देशात डासांचे प्रमाण अधिक वाढल्याने डेंग्यूची लागण देखील वाढू लागली आहे. डेंग्यूचा प्रसार वाढल्याची चिंता व्यक्त केली जात असून डेंग्यूमुळे झालेली लागण आणि मृतांची संख्या देखील वाढू लागली आहे. देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे डेंग्यू रोगाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर बिहारचा असून डेंग्यूचा प्रसार अधिक झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ही बाब अगदीच चिंताजनक असल्याचं समजत आहे. देशात २ लाख ३४ हजाराहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत.

डेंग्यू रोगाचा सर्वाधिक प्रसार देशातील तीन राज्यात झाल्याने पहिल्या तीन क्रमांकामध्ये महाराष्ट्र राज्याचे नाव येते. राज्यात डेंग्यू रुग्णांची संख्या ही १७ हजारांहून अधिक झाली आहे. तर सर्वाधिक ३३ हजार रुग्ण हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. १९ हजारांहून अधिक रुग्णसंख्या ही बिहारमध्ये झाली आहे. एवढंच नाही तर दर तासाला दोन रुग्णांना डेंग्यू होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची संख्या मुंबईत

डेंग्यू रुग्णांच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. अशातच राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या ही मुंबई शहरात आहे. मुंबई शहरात ४ हजार ३०० रुग्णसंख्या आहे. डासांचे प्रमाण अधिक वाढत असल्याने या रोगाचा सामना देशातील लोकांना करावा लागत आहे. मात्र यासाठी आरोग्य विभागाच्या काही सूचना जारी केल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू रोगामुळे रुग्नसंख्येत अधिक वाढ होऊ नये ही काळजी नागरिकांनी घ्यावी.

हे ही

वूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली ‘या’ संघाने मोजले कोट्यवधी

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर

‘इतकं स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं?; ‘नावब’चा जवाब द्या’

अशी घ्या काळजी

डेंग्यूचे प्रसारण हे डासांमुळे होते. अधिकाधिक डास हे स्वच्छ पाण्यात तयार होतात. यामुळे स्वच्छ पाणी उकळून प्यावे.

पिण्याचे पाणी झाकून ठेवावे.

घराच्या आजूबाजूच्या परिसरात झाडं असतील तर त्या ठिकाणी पाणी असण्याची शक्यता असते. त्याठिकाणी डास असण्याची शक्यता असते.

लक्षणे

ताप, पोटदुखी, पुरळ, थकवा, सांध दुखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लेटलेट्स कमी होणं, अशी डेंग्यूची लक्षणं आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी