28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडावूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली 'या' संघाने मोजले कोट्यवधी

वूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली ‘या’ संघाने मोजले कोट्यवधी

वूमन्स आयपीएल अर्थातच (WPL) ची (९ डिसेंबर) दिवशी मुंबईमध्ये घोषणा करण्यात आली आहे. या लिलावात एकूण १६५ महिला खेळाडूंचा समावेश होता. तर यातील १०४ खेळडू हे भारतीय होते आणि ६१ खेळाडू परदेशी होते. लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. मात्र एका भारतीय खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. त्या बोलीने सर्वांना चकित केलं होतं. देशांतर्गत कर्नाटक संघाकडून खेळणारी खेळाडू वृंदा दिनेशला काही संघांनी आपापल्या संघात घेण्यासाठी मोठी बोली लावली होती. मात्र या बोलीतून संघांमध्ये चुरस रंगली होती. १० लाख बेस प्राईसवरून कोट्यवधींच्या घरात वृंदावर लिलाव लावण्यात आला.

फलंदाज वृंदाला आपल्या संघात घेण्यासाठी आरसीबी आणि यूपी वाॅरियिर्सने लिलाव केला. या दोन्ही संघात बराच वेळ बोलीबाबत स्पर्धा सुरू होती. अखेर वृंदाला यूपी वाॅरियर्सने १.३० कोटी रक्कम मोजून संघात स्थान दिलं आहे. १० लाख बेस प्राईसवरुन वृंदाचं नशीब तिच्या कष्टाने आणि ध्येयानं उजळलं आहे. अशातच आणखी एक भारतीय महिला खेळाडू काशवी गौतमवर देखील सर्वाधिक मोठी बोली लावली आहे.

हे ही वाचा

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर

‘इतकं स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं?; ‘नावब’चा जवाब द्या’

समृ्द्धी महामार्गावर होणार ‘या’ सोयीसुविधा

काशवी गौतमवर २ कोटींची बोली

१० लाख बेस प्राईस असलेल्या काशवीला गुजरात जायंट्सने २ कोटी बोली लावली. ही बोली सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे. मात्र मोना मेश्राम, वेदा कृष्णमूर्ती आणि विदर्भाच्या भारती फुलमाली, पूनम राऊतवर कोणीच बोली लावली नाही.

वूमेन्स आयपीएलच्या झालेल्या लिलावात १६४ खेळाडू होते. त्यातील १०४ भारती खेळाडू होते. यामध्ये ६१ परदेशी खेळाडू असून १५ खेळाडू हे सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. संघांसाठी लिलावाला ३० स्लॉट उपलब्ध करुन दिले आहेत. यातील ९ जागांवर परदेशी खेळाडूंचं स्थान आहे. या लिलावात महत्त्वाचं म्हणजे नवख्या खेळाडूंवर कोट्यवधींच्या घरात बोली लावण्यात आली होती. तर याउलट या लिलावात नामांकित खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी