32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयअमित शहांचा अखिलेश यादव यांच्यावर घणाघात

अमित शहांचा अखिलेश यादव यांच्यावर घणाघात

टीम लय भारी
प्रयागराज:- उत्तर प्रदेशमध्ये २०२२ च्या निवडणुकीचे वारे झपाट्याने वाहत आहेत.  यावेळेस माजी पंतप्रधान चरणसिंह यांचे पणतू जयंत चौधरी यांच्या नेतृत्वात रालोद अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे.( Amit Shah lashes out at Akhilesh Yadav)

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा फोकस मथुरा जन्मभूमीवर आहे. जो की अयोध्या आणि वाराणसी सोबतच प्रमुख मंदिरापैकी एक आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात प्रचार करत आहेत. या पश्चिम भागात १०० पेक्षा अधिक जागा आहेत. येथे तीन टप्प्यांत मतदान होईल.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर सणसणीत टीका

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

पंतप्रधान मोदींकडून वर्धा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर

“Career On Line”: M Parrikar’s Son Utpal On Fighting Goa Polls Vs BJP

अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले आहेत की तुमच्यासोबत येत असलेल्या लोकांकडून भरपूर पैसा बाहेर पडत आहे. गुंडगिरी, दहशतवाद मुक्त शासन देण्याचे काम योगी सरकारने केले. अखिलेश यादव तुम्ही मोफत वीज देणार असल्याची गोष्ट करता तुम्हाला तर वीज पुरवठाही करता आला नाही. तुम्ही काय मोफत वीज देणार नाही. २०१७ साली भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशच्या या भागातून ७६% जागा जिंकल्या होत्या. अमित शहा यांनी आज वृंदावनच्या बाके बिहारी मंदीरात पुजा केली. मथुरेत अमित शहा म्हणाले की भाजपच सरकार आल्यापासून गुन्हेगारी कमी झाली. उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आले.

अयोध्या आणि वाराणसी बरोबर मथुरा ही हिंदूंसाठी प्रमुख स्थळ आहे. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य दोघेही नुकतेच कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या पुर्नबांधणीबाबत बोलले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २९ डिसेंबरला मथुरेत एका रॅलीमध्ये बोलले होते की अयोध्या आणि वाराणसीनंतर नंतर काय मथुराला मागे सोडले जाऊ शकते? अयोध्या आणि काशीतही भव्य राम मंदिर होत आहे आता मथुरेत मंदिर बांधण्याची वेळ आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी