27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeराजकीयअनिल गोटे म्हणाले, माझा पुर्नजन्म झाला; लवकरच धुळेकरांच्या सेवेत रुजू होणार

अनिल गोटे म्हणाले, माझा पुर्नजन्म झाला; लवकरच धुळेकरांच्या सेवेत रुजू होणार

गेल्या काही दिवसांपर्वी राष्ट्रवादीचे (NCP)  प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या तब्बेतीबाबत  अफवा पसरविल्या जात होत्या. दरम्यान अनिल गोटे यांनी सोशल मिडीयावरुन त्यांच्या शुभचिंतकांना आपली तब्बेत आता ठणठणीत असून आता माझा पुर्नजन्म झाला असून लवकरच मी धुळेकरांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे सांगितले आहे.

अनिल गोटे म्हणाले, धुळे शहरात माझ्या हितचिंतकांची संख्या काही कमी होत नाही. मला साधी सर्दी झाली की, काही जिवलग चिंतकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. तेलगी प्रकरणाच्या चार वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासात “अनिल गोटे जन्मात बाहेर येणार नाही. चार चौघांच्या खांद्यावरच येईल.” अशा फुसकुल्या सोडून धुळ्यातील जनतेला चलबिचल करण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत मी तब्बल पस्तीस हजार फरकाने निवडूण आलो. तद्नंतर पुन्हा अनेक विकास कामे केली. २०१४ च्या निवडणूकीपुर्वी मला जी.बी.एस. सारख्या गंभीर आजाराने ग्रासले. त्याही वेळी “आता अनिल गोटेंना मत दिले तर पोट निवडणूका होतील.” म्हणजे हे माझ्या मरणाची वाट पाहत होते. मी फिरु शकत नव्हतो. तरी मला धुळेकर जनतेने तब्बल 13 हजारच्या फरकाने निवडूण दिले.

अनिल गोटे म्हणाले, जनतेने निवडूण दिल्यानंतर पांजरा नदीच्या काठावर 11 कि.मी. लांबीचे दोन भव्य रस्ते तयार केले. देशात अन्यत्र कुठेही नाही असा झुलता पुल तयार केला. जनतेने माझ्या शब्दाखातर दिलेल्या फुटक्या व टाकाऊ मांडयातून अठरा टन वजनाची 23 फुट उंचीची भगवान शंकराची मूर्ती उभी केली. धुळे शहराच्या शिरपेचात मानाचे स्थान निर्माण करणारे ग्रंथालय तयार केले. धुळे शहराच्या वैभवात भर टाकण्याचे काम केले.

हे सुद्धा वाचा
उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय : अनिल गोटे

RTO च्या अधिकाऱ्यांची बोगसगिरी, अनिल गोटेंनी उठवला आवाज !

Abdul Sattar : अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव!; अनिल गोटे यांचा हल्लाबोल

रामरावांच्या घरापासून ते शामरावांच्या घरापर्यंत १०० मिटरचे डांबरीकरण (रस्त्याला काळा रंग फासण्याचे) केले म्हणजे जन्माचे सार्थक झाले असे मानणाऱ्या व स्वतःला धन्य समजणाऱ्या भिकारचोटांना विकास म्हणजे काय ? कळाला नाही. एवढीच बौध्दिक क्षमता असणारे मटकावाले व महापालिकेच्या पैशावर स्वतःच्या संसाराचा गाडा हाकणाऱ्यांना माझ्या सारख्या माणसाची अडचण वाटणारच! त्यामुळे माझ्या सध्याच्या आजारात, “अनिल गोटेंना बोलता येत नाही, त्याला काही समजत नाही. ” माझ्या बद्दल त्यांच्या मनात जे काही शेवटचे वाईट असेल, ते झाले आहे. असा गैरसमज पसरविण्यात जीवनाची धन्यता मानीत आहे. अर्थात, राजकीय विरोधकच आहेत असे नाही तर कर्तव्यशून्य जोकरापासून ते राजापर्यंत सर्व सारखेच सहभागी आहेत, असे देखील गोटे यांनी म्हटले आहे.

धुळेकर नागरीकांना माझे वचन आहे की, आता मिळालेले बोनस आयुष्य धुळेकरांच्या चरणी अर्पण करीत आहे. मी कबुल केल्यापैकी सफारी गार्डन तसेच धुळे शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी चकाचक करण्याचे काम व शहरातील नागरीकांना दिवसातून दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याची वचनपूर्ती केल्याशिवाय शांत होणार नाही. असे खुले आवाहन अनिल गोटे यांनी आज आपल्या सोशल मीडियावर केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी