26 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरक्राईम'ईडी'चे अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणी समन्स

‘ईडी’चे अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणी समन्स

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिला ड्रग्ज प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ED) ने समन्स बजावले आहे. 19 डिसेंबर रोजी रकुल प्रीत हिला ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी तीला ईडीने सन 2021 मध्ये विचारपूस केली होती. या प्रकरणात आता तिची मनी लाँड्रीगमध्ये देखील सहभाग आहे का याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.मिळालेल्या वृत्तानुसार या प्रकरणात राणा दग्गुपती, पुरी जगन्नाथ, रवी तेजा, चार्मी कौर नवदीप यांच्यासह इतर काही जणांना देखील नोटीस पाठविण्यात आली आहे.

२ जुलै २०१७ रोजी हे रॅकेट उघडकीस आले होते. त्यावेळी कस्टम ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी केल्विन मस्करेन्हास, एक संगितकार यांच्यासह दोघांकडून ३० लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते.सॉफ्टवेअर इंजिनिअर्स फिल्म इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटी, तसेच विद्यार्थ्यांना ड्रग्ज सप्लाय करत असल्याचे त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये काही टॉलीवूडच्या सेलिब्रिटींचे नंबर देखील सापडले होते. दरम्यान सन 2021 मध्ये ईडीच्या चौकशीच्या आधी अनेक टॉलीवूडचे सेलिब्रिटीजचे तेलंगणाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने एक अंमलीपदार्थांचे रॅकेट उघडकीस आणले होते.

हे सुद्धा वाचा
ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला; लग्नाच्या मुहूर्ताआधीच घडले आक्रीत

चित्रलेखाने घेतला निरोप; ज्ञानेश महारावांनी लिहिले, राम राम अमुचा घ्यावा!

पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार आहात, तर ही बातमी नक्की वाचा

सुशांत प्रकरणात देखील झाली होती चौकशी

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात देखील रकुल प्रीतची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणावेळी ड्रग्ज संबंधीत चौकशी दरम्यान रकुल प्रीतची विचारपूस केली होती. मात्र त्यावेळी या चौकशीत रकुल प्रीतवर कोणतेही आरोप सिद्ध झाले नव्हते. बॉलिवूड आणि टॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या आघाडीवर असलेली रकुल प्रीतच्या अडचणी आता वाढल्या आहेत. ड्रग्ज प्रकरणात आता ईडीने तिला आणि दक्षिणेतील काही सेलिब्रिटीजना समन्स बजावले असून रकुल प्रीत हिची १९ डिसेंबरला चौकशी होणार आहे.

 

 

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!