27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयशिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात (Shinde Group) रोज कोणता ना कोणता राजकीय व्यक्ती किंवा शिवसेनेचे पदाधिकारी जात आहे. हळूहळू बरेच पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांना समर्थन देताना दिसून येत आहेत. अशातच आता शिवसेनेला आणखी एक धक्का लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांची गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांना पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणात्सव गजानन कीर्तिकर हे कुठेच दिसून येत नाहीत. गेल्या महिन्याभरात त्यांच्या पक्षात भूकंप घडत असताना देखील गजानन कीर्तिकर यांनी त्याबाबत काहीच मत व्यक्त केलेले नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, या भेटीमध्ये इतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच खासदार गजानन कीर्तिकर यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :

सोनिया गांधी ईडीच्या शिकार? आज मुंबईसह देशभरात काॅंग्रेसची निदर्शने

शिंदे गटातील विजय चौगुलेंनी गणेश नाईकांवर केले आरोप

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!