31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध – देवेंद्र फडणवीस

राज्यात अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहेत. मराठा बांधवांनी अनेकदा सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र सरकार अजूनही मराठा आरक्षणाबद्दल कोणतेही पाऊल उचलत नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-patil) यांनी सरकारकडे २४ डिसेंबर ही आरक्षणाबाबत अंतिम तारीख दिली होती. मात्र आता तारीख जवळ येऊ लागली आणि निवडणुकाही जवळ येऊ लागल्याने राज्याच्या राजकारणात हालचाल होऊ लागली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आगामी निवडणूक पाहता शरद पवारांचा (Sharad pawar) मराठा आरक्षणाला (Maratha Resrvation) विरोध असल्याचे वक्तव्य केलं आहे. यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक नेते संतापले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शरद पवारांचा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोध आहे. त्यांना दोन्ही समाजाला झुंझवत ठेवायचं आहे. यामध्ये त्यांना नेतेपद मिळेल. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. यावेळी फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका करत महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा आरक्षणाशिवाय इतर प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे म्हणायच्या असं फडणवासांनी नागपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी आपलं सरकार असताना मराठा आरक्षण हे सुप्रिम कोर्टात टीकलं होतं, मात्र सरकार बदलल्याने आरक्षणावर स्थगिती आली.

हे ही वाचा

डॉ. प्रशांत इंगळे बसपाचे मुंबई कोकण झोन प्रभारीपदी नियुक्त

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

संसदेत झालेल्या हल्ल्याचा संदर्भ थेट कल्याणपर्यंत

मराठा समाजाला आरक्षण मिळणार पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावून घेण्यासाठी मराठा बांधव सरकारकडे मागणी देखील करत आहेत. मात्र ओबीसींचा याला नकार असल्याने फडणवीस आणि सरकार गेली काही दिवस मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ओबीसी आरक्षणाला न धक्का लावता देऊ. ओबीसी आरक्षणावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, असं भाजपचं वचन असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.

समाजाचा वोटरबॅंक म्हणून वापर करत नाही

आरक्षण मुद्दा हा समाजाचा असून त्याचा निवडणुकांसाठी म्हणजेच वोटरबॅंक म्हणून वापर करत नाही. आपण निवडणुकीचा विचार करून कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही. मुळात याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी