27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरराजकीयभाच्याचा षडयंत्र रचल्याचा आरोप, मामा देखील नाराज; काँग्रेस हायकमांडला पाठविले पत्र

भाच्याचा षडयंत्र रचल्याचा आरोप, मामा देखील नाराज; काँग्रेस हायकमांडला पाठविले पत्र

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील (Congress) धुसफुस आता बाहेर आली आहे. नाशिक पदवीधरमधून पक्षाने माझ्यासह बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप नुकताच आमदार सत्यजित तांबे यांनी केला होता. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लक्ष्य करत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झा़डल्या. सुत्रांच्या माहितीनुसार आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील हायकमांडला पत्र लिहून पटोले यांनी आम्हाला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. (Balasaheb Thorat’s displeasure with Nana Patole, letter to Congress High Command)

दरम्यानच्या काळात जे राजकारण झाले त्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करत आपण या राजकारणामुळे व्यतित झाल्याचे म्हटले आहे. नाना पटोले यांच्यासोबत आता काम करणे शक्य नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील राजकारण नेमकी कुठली दिशा घेते याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान रविवारी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगमनेर येथील कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजप पर्यंत नेऊन पोहोचवले. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, मधल्या काळामध्ये खूप राजकारण झाले. सत्ता बदल झाल्यानंतर तालुक्यावर सूड उगवावा असे हल्ले होत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांची उद्योगधंदे बंद पाडले जात असून अनेकांना अडचणीत आणले जात आहेत. मागील महिन्यात झालेले राजकारण हे व्यतिथ करणारे आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोलले पाहिजे असे नाही या मताचा मी आहे.

पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर आपण योग्य करू. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. काहींनी भाजपापर्यंत नेऊन पोहोचवले एवढेच नाही तर भाजपाचे तिकीट वाटप सुद्धा केले. काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. असे असले तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत याच विचारांवर वाटचाल सुरू होती. यापुढेही काँग्रेसच्या विचारांवर वाटचाल सुरू राहणार असल्याची ग्वाही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

इराण्यांच्या वस्तीत घुसून पोलिसांची जिगरबाज कामगिरी

सुप्रिया सुळेंचे एकनाथ शिंदेंना पत्र!

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

आशिष देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपमधून आलेल्या नाना पटोलेंना चार वर्षात आठ महत्त्वाची पदे का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या समजूतदार नेत्याला पटोले यांनी त्रास दिल्यानेच थोरात यांनी पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण झाल्याचे म्हटले आहे, असे देशमुख म्हणाले. पटोले यांनी सत्यजित तांबे यांना काँग्रेसपासून दूर केले, तरुण नेत्यांना ते काँग्रेसपासून दूर करण्याचे काम करत आहेत असा आरोप देखील देशमुख यांनी केला. तांबे यांना पाठविलेल्या एबी फॉर्मच्या घोळाची तसेच हांडोरे यांच्या पराभवाची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी