31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयभाजप - शिंदे सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

भाजप – शिंदे सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

टीम लय भारी 

मुंबई : राज्यात भाजप – शिंदे सरकार स्थापनेनंतर त्यांच्या नव्या कारभाराची उत्सुकता राज्यातल्या जनतेला लागली आहे. दरम्यान नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या चर्चेला आता विराम मिळाला असून नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची संभाव्य तारीख पुढे आली आहे. हा शपथविधी सोहळा 12 किंवा 13 जुलै रोजी पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिनसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतांश शिवसेना आमदारांनी बंड पुकारत महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकली. भल्याभल्यांना संभ्रमात टाकणाऱ्या या खेळीने अवघ्या महाराष्ट्राला वेठिस धरले, अखेर सत्तांतरांच्या नाटकाचा पडदा पाडून राज्यात भाजप – शिंदे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले.

या नाट्यमय राजकीय उलथापालथीनंतर सगळ्यांचे आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, हा शपथविधी सोहळा 12 किंवा 13 जुलै रोजी पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याबाबतची उत्सुकता सुद्धा शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, भाजप – शिंदे गटामध्ये येत्या दोन दिवसांत खाते वाटपबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. यावेळी शिंदे गटाला काही महत्त्वाची खाती मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजपकडे गृहखाते आणि महसूल खाते तर शिंदे गटाकडे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत, त्यामुळे कोणत्या खात्यावर कोणाचे नाव हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

‘शिवसेनेला उद्धव ठाकरेच वाचवू शकतात, शिंदेंना भाजपा गिळंकृत करणार’

रस्त्यावर धावणारी ‘जलपरी’ तुम्ही पाहिली का?

दिल्लीहून दुबईला जाणारे विमान कराची विमानतळावर उतरवले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी