32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
HomeराजकीयBalasaheb Thorat : भाजपाला भारतीय शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतो -...

Balasaheb Thorat : भाजपाला भारतीय शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतो – बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

सांगली : भाजपाला शेतक-यांची जिरवायची आहे. त्यामुळे शेतक-यांची पिळवणूक करण्यासाठी परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो, अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. (BJP thinks that Indian farmers are a bigger enemy than Pakistan says Balasaheb Thorat)

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठले आहे. तिथे आजही आंदोलने सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतक-यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.

सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतक-यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेस या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काळा-गोरा असा भेद केला, तणाव निर्माण करुन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जो जनतेत भेद निर्माण करतो त्याचा पराभव होतो. हे आता जगातलं नवं चक्र आहे. भेदभावाचं राजकारण करता येणार नाही हे सांगणारा निर्णय अमेरिकेत होतो आहे असा निर्णय भारतातही झाल्याशिवाय राहणार नाही असंही थोरात यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार मूठभर लोकांसाठी काम करतं आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा आणि आपली पोळी भाजायची पाहिजे तेवढा अन्याय जनतेवर करायचा, जनता काही बोलत नाही. मात्र आता हे धोरण चालणार नाही असंही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी