32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयठाण्यात कंटेनरवर शिवसेना शाखा

ठाण्यात कंटेनरवर शिवसेना शाखा

राज्यात शिवसेना कोणाची यावरून वाद होता. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेंचा (EKNATH SHINDE) असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना शाखेवरून वाद सुरू आहे. काही दिवसांआधी ठाण्यातील मुंब्र्यात शिवसेना शाखा अज्ञात व्यक्तीने पाडल्याने उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) पाहणीसाठी येणार होते, यावेळेस मोठा तणाव निर्माण झाला होता. यावरून शिंदे आणि ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. या घटनेनंतर ठाण्यात पदपथावर कंटेनरचा वापर करून शिवसेना शाखा तयार केल्या आहेत. यामुळे ठाण्यातील शिवाईनगर येथे या शाखेवर वाद निर्माण होऊ शकतो. (SHIV SENA SHAKHA)

मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेचा वाद टोकाला पोहोचल्याने शिंदे गटाच्या राजन किणे यांनी शाखेचे बांधकाम सुरू असे पर्यंत कंटेनरमध्ये रस्त्याच्या कडेला शाखा सुरू केली आहे. या वादात पालिका प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेता या प्रकररणाकडे लक्ष न देण्याचा निर्णय घेतला. यावर पालिकेने कोणतीही कारवाई केली नसताना, शिवाईनगर येथील मुख्य चौकात टीएमटी बस स्थानकाजवळ शिंदे गटाने नवीन शाखेचे उद्घाटन केलं आहे. कंटेनर शाखा ही आठ फूट रूंद आणि चौदा फूट लांब आहे. यामुळे पादचारी मार्गावर पूर्णपणे अडथळा निर्माण होत असून पादचारी मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होतोय.

याआधी रस्ता रुंदीकरणानंतर कळवा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. ठाणे पालिकेच्या प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर शिवाईनगर येथील शाखा नेमकी कोणाच्या परवानगीने पादचारी मार्गावर बसवली, याबाबत माहिती घेतली होती असे वरिष्ठ अधिकारी म्हणाले आहेत. यावर आता शिंदे गट आमदार प्रताप सरनाईकांनी आपले मत वक्त केले आहे

हे ही वाचा 

‘तो आमचा गनिमी कावा असणार’; मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

‘समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते; वाढवण्यासाठी नव्हे’; आव्हडांचा संताप

‘राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी’; चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोवर फडणवीसांचे वक्तव्य

काय म्हणाले प्रताप सरनाईक

शिवसेना शाखांवर दोन्ही गटात वाद टाळण्यासाठी ही सामजस्यांची भूमिका आमच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. शिवाईनगर येथील शाखा दोन वेळा पालिकेच्या ताब्यात गेली होती. यावेळी जमिनदोस्त झालेली शाखा आम्हीच बांधली असल्याचे सरनाईकांचं म्हणणं आहे. मात्र भविष्यात शिवसैनिकांना ज्या ठिकाणी शिवसेना शाखेची मागणी आहे, अशा शाखा उपलब्ध करून दिल्या जातील असे सरनाईक म्हणाले आहेत. यासाठी या शाखेचे कोणतेही पक्के बांधकाम केले नसल्याचे नाईक म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी