36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयकेशव उपाध्ये यांच्या बुडाला मिर्च्या का झोंबतात?

केशव उपाध्ये यांच्या बुडाला मिर्च्या का झोंबतात?

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगावातील सभेवर भाष्य करणाऱ्या व्हिडिओवर नेटीझन्स संतापले; भाजप प्रवक्त्याचा घेतला "क्लास". एकाने थेट म्हटले, केशवराव नुसतं कुत्र्यासारखे भुंकल्याने काही होतं नाही, दूसरा जण म्हणाला, अरे सतरंजी उचल्या तुला बोलण्यातला मतितार्थच नाही कळाला!

केशव उपाध्ये यांच्या बुडाला मिर्च्या का झोंबतात? हा प्रश्न केलाय नेटीझन्सनी. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगावातील सभेवर भाष्य करणाऱ्या उपाध्ये यांच्या व्हिडिओवर नेटीझन्स चांगलेच संतापले. त्यांनी भाजप प्रवक्त्याचा “क्लास” घेतला. एकाने थेट म्हटले, केशवराव नुसतं कुत्र्यासारखे भुंकल्याने काही होतं नाही, दूसरा जण म्हणाला, अरे सतरंजी उचल्या तुला बोलण्यातला मतितार्थच नाही कळाला!

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर त्यांच्या पदाचा तरी मान राखणं तुम्हाला जमलं नाही का ? असा सवाल उपाध्ये यांनी केला. मोदीजी झोलावालेच आहेत, असेही त्यांनी म्हटले. याशिवाय, उद्धव यांच्या सभेला माणसं नाही खुर्च्या असतात, असे सांगणाऱ्या उपाध्ये यांच्या या व्हिडिओ ट्विटनंतर नेटीझन्स चांगलेच तुटून पडले. 

अहो, डोळे उघडे करून नीट बघा; रिकाम्या खुर्च्या नसून लोकांची भरलेली तुडुंब गर्दी आहे, असे हर्षद भाटकर याने सभेतील गर्दीचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले. सागर जगदाळे यांनीही, व्यासपीठावरून दिसणाऱ्या विराट गर्दीचा फोटो ट्विट करून हि कोण आहेत रे केशु, असा सवाल केला आहे. निखिल देवकाते यांनीही गर्दीचा व्हिडिओ टाकून म्हटले आहे – तुझ्या 10 पिढ्यांना जमणार नाही… रे संघोट्या…. लायकी तपास स्वतःची….



नगरचे सीखे, तळ कोकणातले गाणे यासारखी इतर अनेक लोकं शेठजी पक्षात आले. आता तर दाढीवाले आणि त्यांची टीम, उद्या अजून कोणी दादा आणि त्यांची टीम येतील, आपण फक्त त्यांची सेवा करण्यासाठीच? आपल्याला व पक्षातल्या इतर कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षातले नेते विचारत नाही? तुम्ही फक्त सेवा करा, असे किशोर या युझरने म्हटले आहे.

अभिजीत या युझरने नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ भेटीचा फोटो ट्विट करत म्हटले – पाकिस्तानला जाऊन बिर्याणी हादडून आलेल्या बरोबर फक्त तुम्ही आहात देशाची जनता नाही …बसा खाली…🤣
अभिषेक पवार म्हणतो – केशवा, उद्धव ठाकरे यांनी तर फक्त एक उदाहरण दिलं आहे. पण तूझे मोदी शेठ तिथं विमान वळवून गेले आणि घपाघप बिर्याणी ओरपली तेव्हा का मूग गिळून गप्प होतास रे बाळा….??

पाकिस्तानला जाऊन बिर्याणी हादडून आलेल्या बरोबर फक्त तुम्ही आहात देशाची जनता नाही (फोटो क्रेडिट : @NeverGiveup2404)
पाकिस्तानला जाऊन बिर्याणी हादडून आलेल्या बरोबर फक्त तुम्ही आहात देशाची जनता नाही (फोटो क्रेडिट : @NeverGiveup2404)

नागेश डोलकर म्हणतो – अहो त्याच नापाक जमिनीवर गेली 30 वर्ष आपल्या देशाचे एकही प्रधानमंत्री पाकिस्तान दौरा केला नव्हता. त्याच पाकिस्तानमध्ये भाजप दोन सरकारचे दोन्ही प्रधान मंत्री वाजपेयी आणि नरेंद्र मोदी जाऊन आले, त्यांनी पाकिस्तानचा आदर वाढवला होता ना? कारगील, पठाणकोठ हल्ला करून.

प्रशांत या युझरने, उपाध्ये कशाला नाही ती तोडफोड करताय? असा सवाल करून तुम्हाला भविष्य नाही भाजपमध्ये लिहून ठेवा, असा टोला लगावला.

मंगेश शेठे म्हणतात – केशवराव नुसतं कुत्र्यासारखे भुंकल्याने काही होतं नाही, कमेंट वाचून तुझी लायकी काय आहे ते तु ओळखून जा….

निलेश बिडकर याने म्हटले आहे – अरे सतरंजी उचल्या तुला बोलण्यातला मतितार्थच नाही कळाला, ही तुझी अक्कल😆😂

मग दुर्लक्ष कर की.. कोण सांगते भाषण ऐकायला… शिल्लक सेना म्हणता, मग करू दे त्यांना काय करायचे आहे ते.. तुमच्या बुडाला मिर्च्या का झोंबतात? असा सवाल कुलदीप याने केला आहे.

तुम्ही 2014 आधी पण प्रवक्ते होतात साहेब नि आता ही आहात. तुमच्यामागुन कॉंग्रेसमधुन आलेले विखे पाटील मंत्री झाले, तिकडे राणे यांना केंद्रात मंत्री केलं, शिंदे तर डायरेक्टCM .. पण तुम्ही?? असा सवाल स्मिता माने यांनी केला आहे.

सागर जगदाळे यांनी ट्विट केलेला विराट गर्दीचा फोटो
सागर जगदाळे यांनी ट्विट केलेला विराट गर्दीचा फोटो (फोटो क्रेडिट : @SagarnanaJ)

देशाची जनता मोदींसोबत आहे हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. कसबा पोट निवडणुकी विसरले का? भाजपचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे यांनी काय अहवाल दिला आहे ते बघितले नाही का? असा सवाल कुलदीप प्रधान याने केला आहे. प्रशांत बनसोडे म्हणतो – केशवराव प्रवक्ता म्हणून बाजू मांडणे वगैरे ठिक आहे परंतु जरा आपल्याच पक्षाच्या वतीने केला गेलेला सर्व्हे आणि आपल्याच पक्षातील ‘मराठी’ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सादर केलेला महाराष्ट्राबाबतीतला अहवाल एकदा अभ्यासा.. पाय आपसुक जमिनीवर येतील.

राज अंबिके म्हणतात – मोदी म्हणजे देश नाही. भारत देशातील 140 करोड जनतेपैकी फक्त 39 टक्केच जनतेने भाजपला मतदान केले. बाकीच्यांनी भाजपला आणि मोदीला नाकारले आहे. महागाई कमी करणार काळा पैसा भारतात आणणार प्रत्येकाच्या खात्यात ₹15 लाख जमा होणार या आश्वासनांचे काय झाले ?? दगाबाज भाजप #Feku_Bjp

अमित चव्हाण हा केशव उपाध्ये यांना म्हणतोय – तुला उपचाराची गरज आहे
अजित हा युझर म्हणतो – भाजपकडे इतका पैसा आहे, तर मग ते आपल्या अशा कार्यकर्त्यांचा चांगला इलाज का करून घेत नाहीत? आता तर त्यांना मराठीही नीट कळेनासं झालं आहे.

सोमनाथ कळसकर म्हणतो – सतरंजी उचलायची नीट घडी करायची आणि सांगेल तेंव्हा टीव्हीला बाईट द्यायची

झाल्या का सतरंज्या उचलून ? हे घ्या मग आता तुमचे बक्षीस. - दिलीप माने
झाल्या का सतरंज्या उचलून ? हे घ्या मग आता तुमचे बक्षीस. – दिलीप माने (फोटो क्रेडिट : @SimpleDilip)

दिलीप याने दोन रुपयांच्या जुन्या नोटेचा फोटो टाकून म्हटले आहे – झाल्या का सतरंज्या उचलून ? हे घ्या मग आता तुमचे बक्षीस.

अमोल पोळेकर या युझरने केशव उपाध्ये यांना खुले आव्हान दिले आहे. तु स्वत: एक सभा घेतो का? मैदान सोड ग़ल्ली मध्येच घे, पाहू किती लोक येतात…🤣

त्यांच्या सभेला गर्दी नाही याची काळजी तुम्ही का करत आहात…. असे प्रशांत जाधव याने म्हटले आहे.

या पोस्टसाठी तुम्हाला सरपंच करु.. ओके ना, अशी खिल्ली एकाने उडविली आहे तर कोई मेरेको तिकीट देदो रे भाई….🙏🙏 असा टोला दुसऱ्याने लगावला आहे. केशवा माधवा तुझ्या नावा चा रे सगळ्याना विटाळा… असेही एकाने म्हटले आहे.

 

चंद्रशेखर हा युझर म्हणतो – केशु बाळ त्या चीनने म्हणे अरुणाचल प्रदेशच्या काही नावे बदलली यावर पण बोल, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपविषयी बोल, महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान सोहळ्यातील हत्याकांड प्रकरणी बोल, मग मोदींच्या एकेरी उल्लेख वर बोल.

हे सुद्धा वाचा : 

आदित्य ठाकरे म्हणाले, 7 वाजल्यानंतर गुलाबराव पाटील थरथरायला लागतात

पाकिस्तान ही सांगेल शिवसेना कोणाची, पण निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला : उद्धव ठाकरे

गद्दारांना जनताच रस्त्यावर पकडून मारणार : संजय राऊत

खळबट्या हा युझर म्हणतो – चेहरा का बर एव्हढा उतरलाय? मनात नसतानाही ठाकरेंवर टीका करायला लावताना वरिष्ठ तुम्हाला काय काय आदेश देतात, ते चेहऱ्यावर दिसतंय उपाध्ये.
चैतन्य नलावडे याने उतरलेल्या चेहऱ्यावरून उपाध्ये यांची टर उडविली आहे. त्याने म्हटले आहे – टॉयलेट कॉल आला आहे, तिकडे जा बाबा पटकन, इथे नको वेळ वाया घालवू.

कमलेश गोरूळे म्हणतो – अरे केशवा सतरंजी, तू भाजपच्या ऑफिस मध्ये जा, तिथे झाडू मार, सतरंज्या उचल, जे भ्रष्टाचारी नेते दुसऱ्या पक्षातून येऊन आता भाजपचे आमदार खासदार मंत्री झालेत त्यांच्या चपला उचल…. ही तुझी लायकी केली भाजपने, पडळकर आमदार आहे आणि तू सतरंज्या……….

उपाध्ये यांची “शाळा” घेतलेला हा संपूर्ण चिवचिवाट या लिंकवर क्लिक करून वाचा

Keshav Upadhye Mirchi Bite, Pachora Sabha, Uddhav Thakre, Upadhyes Bubble, Budala Mirchya

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी