33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयगाल पाहणाऱ्याचे थोबाड फोडण्याचा इशारा : चित्रा वाघ

गाल पाहणाऱ्याचे थोबाड फोडण्याचा इशारा : चित्रा वाघ

टीम लय भारी

पुणे : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी  बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांची तुलना रस्त्यांसोबत केली. ”हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईन” असं वक्तव्य पाटलांनी केलं होतं. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ  यांनी थोबाड फोडण्याचा इशारा पाटलांना दिला आहे.तसेच गुन्हा दाखल न झाल्यास गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. या वादानंतर आता गुलाबराव पाटील यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.(Chitra Wagh hint, slapping the face shivsena minister)

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”

चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर साधला निशाणा

जनतेच्या पैशावर डल्ला मारणा-या ‘ठग्ज ॲाफ बीएमसी’ ला कोण वाचवतंय ? चित्रा वाघ यांचा सवाल

”शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत. पण यामध्ये पोलिस यंत्रणांना महिलांचा विनयभंग दिसत नाही.मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तत्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा सज्जड दम चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.

”शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत. पण यामध्ये पोलिस यंत्रणांना महिलांचा विनयभंग दिसत नाही.मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तत्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा सज्जड दम चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

Law and order in Mumbai gone to potholes of city roads, says BJP’s Chitra Wagh over Kurla rape case

चित्रा वाघ म्हणाल्या, “गुलाबराव पाटील हा राज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झालंय? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती.” हे सरकार गुलाबराव पाटलांचं मंत्रीपद काढून घेणार आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलाय.

“सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे की या गुलाबराव पाटलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी