25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeराजकीयमंत्र्यांची आक्षेपार्ह वक्तव्ये, जमीन घोटाळे, सीमावादावरुन गाजले हिवाळी अधिवेशन

मंत्र्यांची आक्षेपार्ह वक्तव्ये, जमीन घोटाळे, सीमावादावरुन गाजले हिवाळी अधिवेशन

यंदाचे हिवाळी अधिवेशन (Conclusion of winter session) विरोधीपक्षांच्या आक्रमकतेमुळे गाजले. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, बेजबाबदार वक्तव्ये, शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आणि महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्दयावरुन विरोधी पक्षांनी या अधिशेनता सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ambadas Danve)

राज्य विधीमंडळाच्या (Conclusion of winter session) हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली यानंतर आता पुढील बजेटचं अधिवेशन २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. यंदाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislature Winter Session) विरोधीपक्षांच्या आक्रमकतेमुळे गाजले. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, बेजबाबदार वक्तव्ये, शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आणि महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या (Maharashtra Karnataka border dispute) मुद्दयावरुन विरोधी पक्षांनी या अधिशेनता सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. ( Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ambadas Danve)

अधिवेशनाच्या पु्र्वसंधेला चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालत अधिवेशनाच्या पहिल्यादिवशीपासूनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी आंदोलने केली. अधिवेशन समाप्तीच्या आदल्या दिवशी देखील विधानसभा अध्यक्षांवर अविश्वासाच्या ठरावाचा प्रस्तावाचे पत्र देत विरोधीपक्षांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरुन हटविण्याच्या मागण्यांपासून ते सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विरोधीपक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच सत्तार यांच्यावर गायरान जमीनीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा असो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर (Eknath Shinde) भुखंड भ्रष्टाचाराचा आरोप असो विरोधकांनी या अधिवेशनात सत्ताधारी पक्षांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. तसेच विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलू देत नसल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांवरच अविश्वास ठरावाचा प्रस्ताव देत सत्ताधारी पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर देखील आरोप प्रत्यारोप झाले. आदित्य ठाकरे यांच्यावर या अधिवेशनात दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आरोप करत त्यांची एसआयटी चौकशीची देखील मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत असंविधानिक शब्दप्रयोग वापरल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार विरोध करत जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. यामुद्द्यावरुन विधिमंडळात जोरदार गदारोळ झाला.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचा विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’सारखी योजना लागू होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर जोरदार प्रहार करत अनेक मुदद्यांवर सरकारचे लक्ष वेधले. तसेच विधान परिषदेत देखील विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, पिक विमा, राज्याबाहेर गेलेले उद्योग अशा अनेक मुद्द्यावर विधानपरिषदेत दानवे यांनी आवाज उठवला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील विरोधकांच्या प्रत्येक आव्हानाला प्रतिआव्हान देत विधिमंडळात सत्ताधारी पक्षाची बाजू लावून धरली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी कोंडीत सापडणार नाही याची काळजी घेतली. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी सर्वाधिक लक्षवेधी लागल्या. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील राज्यपालांच्या वक्तव्यांबाबत विरोधकांनी जोरदार आवाज उठवत राज्यपालांना हटविण्याची जोरदार मागणी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी