28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या बंगल्यावर ‘कोरोना’, १२ रूग्ण सापडले

शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कोरोना’, १२ रूग्ण सापडले

टीम लय भारी

ठाणे : शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्वर ओक’ बंगल्याच्या परिसरात ‘कोरोना’ने घुसखोरी केली आहे. या परिसरात तब्बल १२ ‘कोरोना’ रूग्ण आढळल्याचे सूत्रांनी सांगितले ( Corona patient found at Sharad Pawar’s resident ).

पवार यांच्या घरात काम करीत असलेल्या दोन, तर सुरक्षा रक्षकांमधील तिघाजणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

पार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

मंत्रीमंडळाची बैठक रायगडावर घ्यावी : छत्रपती संभाजीराजे

पवार साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ?

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

शरद पवार व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची ब्रीच कॅण्डी रूग्णालयात तपासणी केली असता सुदैवाने पवारांसहित सर्व कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे ( Sharad Pawar tested corona negative ).

पवारांनी आता दौरे करू नयेत अशी आपण त्यांना विनंती करणार असल्याचे टोपे म्हणाले. पवार साहेब उत्साही आहेत. समाजाप्रती ते आपली बांधिलकी जपतात. बऱ्याचदा स्वतः फिरण्यातून त्यांना संदेश द्यायचे असतात. परंतु असे फिरणे घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांना विनंती करणार असल्याचे टोपे म्हणाले ( Rajesh Tope will request to Sharad Pawar ).

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी