27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयपार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

पार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

टीम लय भारी

नवी मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या पार्थ पवार हा विषय खूपच हॉट ठरला आहे. पार्थ पवार यांच्या समर्थकांनी मात्र या वादंगाकडे दुर्लक्ष करीत सामाजिक कार्यात झोकून दिले आहे ( Parth Pawar followers helped to citizens in Corona Pandemic ).

‘कोरोना’ महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी ‘पार्थ दादा पवार फाऊंडेशन’ व राष्ट्रवादी काँग्रेस धावून गेली आहे. पार्थ समर्थक कार्यकर्त्यांनी खारघरमधील सोसायट्यांमध्ये जावून नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप केले ( Parth Pawar foundation and NCP provide sanitizer to Kharghar citizens). ‘कोरोना’ काळात स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, असेही आवाहन या कार्यकर्त्यांनी केले.

Parth Pawar helps to people
पार्थ पवार यांच्या समर्थकांनी खारघर परिसरातील लोकांना सॅनिटायझरचे वाटप केले

पनवेल, खारघर परिसरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. या परिसरात सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने राहतात. या सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने सॅनिटायझर वाटप करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती ( Parth Pawar contested election from Maval constituency ). या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतरही त्यांनी या मतदारसंघात काम सुरूच ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले ( Parth Pawar lost election in Maval constituency ).

हे सुद्धा वाचा

पवार साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ?

VIDEO : देवेंद्र फडणविसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; बदल्यांमध्ये ‘अर्थ’पूर्ण व भयानक प्रकार

अजित पवारांना राज्यपालांनी मारली कोपरखळी

‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

धनगर समाजाच्या ‘या’ मागणीसाठी सुप्रिया सुळे पुढाकार घेणार

मंत्रीमंडळाची बैठक रायगडावर घ्यावी : छत्रपती संभाजीराजे

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका नगरसेवक विजय खाणावकर, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी. ए. पाटील व पनवेल शहर जिल्हा सहसचिव बबनराव पवार यांच्या सहकार्याने हे सॅनिटायझर वाटपाचे काम हाती घेण्यात आले होते.

यावेळी खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके आणि महिला अध्यक्ष राजश्री कदम यांचाही सहभाग होता.

खारघरमधील विविध सोसायट्या आणि अतिआवश्यक सेवेत काम करणाऱ्या कुटुंबांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांनी पार्थ पवार यांच्याविषयी कौतुकोद्गार काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

Parth Pawar helps to Policemen
पार्थ पवार समर्थकांनी पोलिसांनाही सॅनिटायझरचे वाटप केले

यावेळी प्रमोद बागल, अजिनाथ सावंत, शेहबाज पटेल, विलास खारटमोल, विजय मयेकर, इम्रान सुभेदार, सुनंदा कुंभार, छाया वैराग, संगीता पवार रेखा भागवत, विजय उप्पल, कडू काका, लक्ष्मण ठाकूर, सतीश अवघडे, योगेश निपाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी