28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयदाऊद इब्राहिमला झाली विषबाधा? पाकिस्तानातील इंटरनेटसेवा बंद; काहीतरी गौडबंगाल?

दाऊद इब्राहिमला झाली विषबाधा? पाकिस्तानातील इंटरनेटसेवा बंद; काहीतरी गौडबंगाल?

मुंबई शहरात १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट करणारा दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी अनेक वर्षांपासून पोलीस यंत्रणा सुरक्षादल आहे. मात्र अजूनही दाऊद इब्राहिम आपले चेहरे बदलत चकवे देत आपलं जीवन जगत आहे. मात्र आता दाऊद इब्राहिमला विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पाकिस्तान येथील सोशल मीडिया वृत्ताच्या माध्यमातून समोर आली आहे. मात्र पाकिस्तानमधील अजून एकाही वृत्तपत्राने याबाबत कोणतीही माहिती सांगितली नाही. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

दाऊत ज्या रूग्णालयात दाखल आहे त्या रूग्णालयाला कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. दाऊद ज्या ठिकाणी अॅडमिट आहे. त्या मजल्यावर दाऊद व्यतिरिक्त इतर कोणताही पेशंट नसल्याची माहिती समोर येत आहे. रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना मजल्यापर्यंत प्रवेश आहे. अशातच दाऊदला पाकिस्तानात विषबाधा झाली असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याची बातमी समोर आली आहे. लाहोर, कराची आणि इस्लामाबादसारख्या शहरांमध्येही सर्व्हर डाऊन असल्याचं समजतंय. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम देखील काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा

धारावी मोर्च्यावर राज ठाकरे कडाडले; कंत्राट काढून १० महिने झाले अन् मोर्चा आज का?

मुंबई इंडियन्स संघासोबत सचिन तेंडुलकरचं नातं संपुष्टात?

‘रश्मिका मंदान्नापेक्षा माझी आजी पाणी कम चाय…’

जगभरातील इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि इंटरनेट डिजिटल गव्हर्नन्सवर देखरेख ठेवणाऱ्या नेटब्लॉक या संस्थेने पाकिस्तानमधील सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीवर पुष्टी करण्यात आली. यावर पाकिस्तानी पत्रकाराने माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या पकिस्तानी पत्रकार? 

पाकिस्तानी पत्रकार काझमी म्हणाल्या, दाऊद इब्राहिमवर विषबाधा झाली आहे. त्याला कराचीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती खालावली आहे. ही बातमी सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र यामध्ये किती तथ्य आहे. हे माहित नाही. मात्र यामध्ये नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याच्या चर्चा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी