28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'चमचे का वाजताहेत'; धारावी मोर्च्यावरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार

‘चमचे का वाजताहेत’; धारावी मोर्च्यावरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार

काही दिवसांआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसैनिकांनी मुंबई येथे धारावीचा विकास प्रकल्पाचे काम हे अदानी (Adani) उद्योगसमूहास देण्याविरोधात मोर्चा काढला होता. यावर आज राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मोर्चा आजच काढायला सुचलं कसं? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंवर जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत. मी मोर्चा काढून प्रश्न अदानीला विचारला होता. बाकिचे चमचे का वाजत आहेत? असा उद्धव ठकरेंनी सावल उपस्थित केला. सध्याच्या सरकारएवढा उघडानागडा कारभार कोणत्याही सरकारने केला नसल्याचे उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले आहेत. अर्धवट माहिती असलेल्यांनी मला विचारू नये. शालीचं वजन झेपतंय का? असा मिश्किल सवाल करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे कान टोचले आहेत.

त्याचप्रमाणे मनसेसोबत उद्धव ठाकरेंनी भाजपची देखील चांगलीच खरडपट्टी काढली आहे. मनसेवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला होता. धारावीच्या आंदोलनासाठी चंद्रावरून माणसं आणली अशी टीका भाजपने केली असता, उद्धव ठाकरे यांनी होय चंद्रावरून आणली माणसं कारण पंतप्रधानांनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे. मुद्दा धारावी आणि मुंबईचा आहे त्यामुळे मुद्द्याचं बोला,अशी बोचरी टीका केली आहे.

हे ही वाचा

दाऊद इब्राहिमला झाली विषबाधा? पाकिस्तानातील इंटरनेटसेवा बंद; काहीतरी गौडबंगाल?

धारावी मोर्च्यावर राज ठाकरे कडाडले; कंत्राट काढून १० महिने झाले अन् मोर्चा आज का?

मुंबई इंडियन्स संघासोबत सचिन तेंडुलकरचं नातं संपुष्टात?

तर सेटलमेंट होणार कशी?

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर मोर्चा आज का काढला? कंत्राट येऊन १० महिने झाले. सेंटलमेंट होणार असेल अशी टीका राज ठाकरेंनी केली. यावर आता उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सेंटलमेंट होणार कशी कारण सोबत सर्व कॉंग्रेस कमुनिस्ट पक्षांची मंडळी होती. जर भाजप असती तर अदानीसोबत सेटलमेंट झाली असती, असं उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरलं आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र मुंबईच्या सर्व डायमंड कंपन्या गुजरातला घेऊन चालले आहेत. मोदी राज्याचे मुख्यमंत्री असते तर मान्य आहे. मात्र पंतप्रधान असतानाही ते ‘गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा’ असे वक्तव्य करत आहेत.  मोदींनी केलेल्या वक्तव्याचं उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटलं.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी