32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयधक्कादायक : मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिष परशुरामे यांचे निधन

धक्कादायक : मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिष परशुरामे यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातील उपसचिव अनिष परशुरामे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले. (Deputy C M’sDeputy Secretary Anish Parashurame passes away)

त्यांचे वय साधारण ५० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. चार व एक अशा अत्यंत कोवळ्या वयातील मुलांचे पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेने कधीही ठरवून मुस्लिमांना विरोध केला नाही, आमच्या हिंदुत्वाच्या व्याखेत सर्व जातीधर्मांना स्थान: संजय राऊत

मुख्यमंत्री म्हणाले; ‘शाब्बास, दिल्लीत झेंडा फडकवलात’ !

७३ वा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत राष्ट्रध्वज फडकवला

BJP’s Ram Kadam Requests Maha CM Uddhav Thackeray to Dedicate Memorial to Lata Mangeshkar at Shivaji Park

परशुरामे यांना दोन दिवसांत दोन वेळा हृदयविकाराचा त्रास झाला होता. सोमवारी रात्री त्यांना पहिला हृदयविकराचा धक्का बसला. त्यामुळे त्यांना त्या रात्री रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री १.३० वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी परशुरामे यांना हृदयविकाराचा धक्का जाणवला. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा दुसरी शस्त्रक्रीया करण्यात आली. परंतु आज पहाटे त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

महत्वाच्या फाईल सांभाळण्याची जबाबदारी परशुरामे यांच्याकडे होती

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे उपसचिव या नात्याने अनिष परशुरामे यांच्याकडे काही खात्यांची जबाबदारी होती. त्यापैकी महसूल व नगरविकास या महत्वाच्या खात्यातील फायलींची जबाबदारी ते सांभाळायचे.

महसूल, नगरविकास इत्यादी खात्यांकडून आलेल्या फाईलींची बारकाईने तपासणी करायची. त्या फाईलमधील तपशिलात नक्की दडलंय त्याबाबतची प्रशासकीय माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची, अशा पद्धतीचे काम परशुरामे सांभाळायचे. परशुरामे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच एखादी फाईल मंजूर करायची किंवा नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री मुख्यमंत्री घेत असतात.

परशुरामे यांच्या अचानक जाण्याने मंत्रालयातील अधिकारी वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी