25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणविसांचे सदाभाऊंवर प्रेम

चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणविसांचे सदाभाऊंवर प्रेम

टीम लय भारी

मुंबई : सदाभाऊ खोत यांना भारतीय जनता पार्टीत मानाचे स्थान आहे. यापुढील काळात देखील पक्षात आणि सत्तेमध्ये सदाभाऊंना सन्मान देण्यात येईल. देवेंद्र फडवणीस यांचे सदाभाऊंवर विशेष प्रेम आहे, अशी भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली ( Devendra Fadnavis has a special love for Sadabhau ).

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्यामार्फत प्रा. एन. डी. चौगुले यांचा4 अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना फटका बसण्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर केली आहे.

हे सुद्धा वाचा

धनगर समाजाला जवळ करण्यासाठी बाळासाहेब थोरातांची खेळी

Devendra Fadnavis : काँग्रेस – राष्ट्रवादीतील सरंजामदारांना वठणीवर आणणारा नेता ( सदाभाऊ खोत )

Corona : शेतक-यांच्या अंगणात सदाभाऊंचे अनोखे आंदोलन

चंद्रकांत पाटील यांनी समजूत घातल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी प्रा. चौगुले यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आता भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचाच प्रचार करणार असल्याचे खोत यांनी जाहीर केले आहे.

इंग्रजी अनुवाद : Sadabhau Khot has a prominent position in the Bharatiya Janata Party. Sadabhau will be honored in the party and in power in the future as well. Devendra Fadnavis has a special love for Sadabhau, said BJP state president Chandrakant Patil.

Prof. N. D. Chowgule had filed application for Vidhanparishad election. Therefore, there were signs that BJP candidate Sangram Deshmukh would be hit.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी