35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयपंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

टीम लय भारी

मुंबई :- भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीला पंतप्रधान मोदींना भेटायला गेल्या होत्या. दिल्लीहुन आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्या म्हणाल्या माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. असे म्हणत पंकजा मुंडेंनी राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती. यावर आता पंकजा मुंडेंच्या भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे (Devendra Fadnavis reacted to Pankaja Munde speech).

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केले, तुम्ही ते भाषण ऐकले का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असे म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

रोहित पवारांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक; तर भाजपला लगावला टोला

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर “बीग बी शो बिग हार्ट” म्हणत मनसेची पोस्टरबाजी

पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असे म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणे टाळले आहे (I dont mean to talk he said adding that Fadnavis has refrained from speaking further on the issue of Pankaja).

Devendra Fadnavis reacted to Pankaja Munde speech
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे

शरद पवार यांच्या हस्ते, मुंबईच्या डब्बेवाल्यांना मोफत सायकल वाटप

BJP’s Devendra Fadnavis Taunt To Maharashtra Coalition On Assembly Speaker’s Election

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे

प्रीतम मुंडे यांचे नाव मंत्रिमंडळाच्या विस्तार यादीतून डावलण्यात आल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचे सत्र सुरु केले. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली वारी देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा निराधार करत नाही. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.

यानंतर त्या म्हणाल्या माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचे वृत्त काही माध्यमांनी चालवले. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसे काही दिसते का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही कधी राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी