29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीचा निकाल 16 जुलैला जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

दहावीचा निकाल 16 जुलैला जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र एसएससी बोर्डचा निकाल टांगणीला लागला होता. दहावीचा निकाल कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै म्हणजेच आज दहावीचा निकाल जाहीर होणार होता, पण तो अध्यापही लागला नाही. याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. तर उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे (The results of the Class tenth examination will be announced tomorrow).

राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली (State School Education Minister Varsha Gaikwad informed about this).

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

रोहित पवारांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक; तर भाजपला लगावला टोला

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्याने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आले होते. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. आता मिळाल्या नवीन माहितीनुसार उद्या दाहवीचा निकाल जाहीर होणार आहे.

results of the Class tenth examination will be tomorrow
दहावीचा निकाल

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर “बीग बी शो बिग हार्ट” म्हणत मनसेची पोस्टरबाजी

Maharashtra 10th SSC Result 2021 Date: MSBSHSE 10th Result tomorrow at 1 pm

या वेबसाईटवर निकाल पाहू शकता

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

असा पहा तुमचा दाहवीचा निकाल

  • वर दिलेल्या कोणत्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
  • यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी