29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी 287 कोटी !

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी 287 कोटी !

मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या पार पडलेल्या समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश आलं आहे. परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सुधारित आराखड्यास मान्यता दिली आहे. यासाठी राज्यशासनाने वैद्यनाथ तिर्थक्षेत्रासाठी 287 कोटींचा हातभार लावला. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळीचे ग्रामदैवत असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासाचा मूळ आराखड्यासाठी 133 कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र दगडी भिंती बांधून मंदिराचा जीर्णोद्धार करणे, भाविकांना थांबण्यासाठी यात्री प्रतीक्षालय अशी एकूण 92 कामे करायची आहेत. या कामांचा खर्च आता आधिक पटीने वाढला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या सूचनेनुसार बीडच्या जिल्हाधिकार्यांनी या कामाचा सुधारित आराखडा मान्यतेनुसार सादर केला असून धनंजय मुंडेंच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे. यावरती धनंजय मुंडेंनी आपले मत व्यक्त केले आहे.

धनंजय मुंडेंनी व्यक्त केले आपले मत

अनेक शतकापूर्वी वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला होता. त्याच धर्तीवर आता नव्याने जीर्णोद्धार व विकास व्हावा, प्रदक्षिणा मार्ग विकसित व्हावा, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ, मेरू पर्वत तसेच इतर मंदिरांसह परिसरातील अन्य सर्व मंदिरांचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने हा विकास आराखडा मंजूर व्हावा. हे अत्यंत आवश्यक असल्याचं मत धनंजय मुंडेंनी व्यक्त केलं. तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सुचना दिल्या आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या सुचना

जुन्या मंदिरांना रंग न लावता त्यांना दगडासारखा रंग द्यावा, मंदिराची देखभाल तसेच दुरुस्तीची जबाबदारी मंदिर समिती आणि परळी नगर परिषदेने घ्यावी. तसेच ठिकठिकाणी सावली देणारी झाडे लावावीत शिवाय पाय घसरणार नाहीत अशा फरश्यांचा वापर पायऱ्यांवर करावा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्या.

हे ही वाचा

४८ तासांनंतरही हेरंब कुलकर्णींवरील हल्लेखोर फरार, मुख्यमंत्र्यांकडून हेरंब यांची विचारपूस

…अन्यथा टोलनाके जाळून टाकू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

५ राज्यांच्या ७ नोव्हेंबरपासून निवडणुका, आचारसंहिता लागू

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी या 286.68 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वित्त व नियोजन विभागाचे सचिव, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, माजी नगराध्यक्ष, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, नगर अभियंता श्री.बेंडले, आर्किटेक्ट कृष्णकुमार बांगर यांसह आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी