32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयधनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट

धनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट

 

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाने वातावरण पेटलं आहे. तरीही सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलायचं नाव घेत नाही. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होत आहे. काही मराठा आंदोलकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. अशातच आता धनगर समाजाने देखील एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबत अमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. राज्यातली धनगर आरक्षणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातही धनगर समाजाने उपोषणास सुरुवात केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात माण तालुक्यातील दहिवडी येथे काही धनगर बांधवांनी धनगर आरक्षणासाठी उपोषण केलं होतं. हे उपोषण १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरू होते. एकूण पाच दिवस हे उपोषण करण्यात आले. हे उपोषण आणखी काही दिवस करण्याचा मानस धनगर बांधवांचा होता मात्र शंभूराज देसाईंनी हे उपोषण मागे घेण्यास सांगितले. २ महिन्यात आरक्षण देऊ म्हणून धनगर बांधवांना आश्वासन दिले होते. यामुळे उपोषणकर्ते शरद गोरड, सुरेश गोरड, वैभव गोरड, उत्तम विरकर, नितीन कटरे यांनी बेमुदत उपोषण सोडलं. मात्र आता शंभूराज देसाईंनी दिलेला कालावधी संपत आला तरीही सरकार कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही, अशी माहीती शरद वीरकर यांनी दिली आहे.

हे ही वाचा

अॅनिमल चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड्स

तेलंगणात विमानाचा अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्याचा जरांगेंचा इशारा

दरम्यान, उत्तर वीरकर, शरद गोरड, वैभव गोरड, सुरेश गोरड, नितीन कटरे हे ३७८ किमीची पायपीट करत मुंबईत मंत्रालयात दाखल झाले होते. मात्र यावेळी त्यांच्या भावना ऐकून घेतल्या जात नव्हत्या. अशी माहिती शरद गोरड यांनी दिली आहे. (४ डिसेंबर) दिवशी सकाळी आंदोलन कर्त्यांनाही काही पोलिसांनी कुर्ला येथे दडपशाही केल्याची माहिती स्वतः शरद गोरड यांनी दिली आहे. येत्या काही दिवसात सरकारने न ऐकल्यास महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना आम्ही एकत्रित करू, असे देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.

अशातच राज्यात धनगर आरक्षणाबाबत वातावरण तापलं आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात काही दिवसांपासून एनएच 4 पुणे – बंगळुरू महामार्ग धनगर समाजाने बंद ठेवला होता. या ठिकाणी खंडाळा तालुक्यातील अनेक गावांनी आपली उपस्थिती दाखवली होती. यात धनगरवाडी, केसुर्डी, शेखमिरेवाडी तसेच इतर काही गावांचा देखील समावेश होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी