देशातच काय तर जगात अॅनिमल (Animal Film) चित्रपटाची अधिक चर्चा होत आहे. याचसह अभिनेता विकी कौशलच्या सॅम बहादूर या चित्रपटाला तोडीस तोड देणारा चित्रपट म्हणून अॅनिमलची चर्चा आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्डब्रेक केले आहेत. यात विजय बलबीर सिंहची प्रमुख भूमिका रणबीर कपूर (Ranveer Kapoor) साकारत आहे. तर त्यांची पत्नी गीतांजलीची भूमिका ही साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने (Rashmika Mandanna) साकारली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Animal Box Office) छप्पर तोड कमाई केली आहे. पठाण, टायगर 3, गद्दर 2 या चित्रपटांच्या अडवान्स बुकींकहून अधिक कमाई अॅनिमल चित्रपटाने केली आहे, यामुळे या चित्रपटाची चर्चा अनेक ठिकाणी आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संदीप वांगा रेड्डी यांनी केलं असून या चित्रपटात बॉबी देओलनेही चांगली भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर नजर टाकल्यास चित्रपट रिलीजच्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबर दिवशी ६३.१ कोटींएवढी कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ६६.२७ कोटींएवढी कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी ७२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. या तीनही दिवसांच्या कमाईचा विचार केला तर अॅनिमलने २०२.७५ कोटींएवढी कमाई केली आहे. तर जगभरातील ३४० कोटींवर कमाई गेली आहे.
हे ही वाचा
तेलंगणात विमानाचा अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्याचा जरांगेंचा इशारा
बारामती मतदारसंघात अजित पवारांचा उमेद्वार की सुप्रिया सुळे? बारामतीकर कन्फ्यूज
अडवान्स बुकींकबाबत विचार केल्यास पठाण (३२ कोटी), टायगर 3 (२२ कोटी) , तर गद्दर 2 (१७ कोटी) एवढी कमाई या चिच्रपटाने केली आहे. मात्र अशातच अॅनिमल चित्रपटाचा विचार केल्यास (३३ कोटी) कमाई केली आहे. रणबीर कपूरच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
BOX OFFICE TSUNAMI!#AnimalHuntBegins
Book Your Tickets 🎟️ https://t.co/kAvgndK34I#Animal#AnimalInCinemasNow #AnimalTheFilm @AnimalTheFilm @AnilKapoor #RanbirKapoor @iamRashmika @thedeol @tripti_dimri23@imvangasandeep #BhushanKumar @VangaPranay @MuradKhetani… pic.twitter.com/LIYHpyvEuh
— Animal The Film (@AnimalTheFilm) December 4, 2023
थोडसं चित्रपटाबद्दल
अॅनिमल चित्रपटाचा विचार केल्यास वडील आणि मुलाच्या नात्यातील ही गुंतागंतीची गोष्ट आहे. आतापर्यंत आपण काही चित्रपटांमध्ये वडीलांनी आपल्या मुलांसाठी खाल्लेल्या खस्ता, लावलेला जीव अशा अनेक स्वरूपाचे कथानक अनुभवले असेल, मात्र या सिनेमात आपल्या वडीलांसाठी कोणाचंही न ऐकून घेणारा कशाचीही परवा न करणाऱ्या मुलाचं आपल्या वडीलांबाबत निस्सीम प्रेम हे एका वेगळ्याच पातळीवर दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटासाठी मोठी स्टारकास्ट घेण्यात आली आहे, तर त्यांनी यासाठी किती फी आकारली आहे, हे देखील सांगितलं आहे.
रणबीर कपूरने सर्वाधिक ४-५ कोटींएवढी फी या चित्रपटासाठी आकारली आहे. तर रश्मिकाने ४ कोटी, बॉबी देओलने ४ कोटी, अनिल कपूर यांनी २ कोटींएवढी फी घेतली आहे. दरम्यान, हा रिपोर्ट पिंकवीलाच्या माहितीनुसार देण्यात आला आहे.