33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयगिरीश महाजनांच्या वक्तव्यावर कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्याचा जरांगेंचा इशारा

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्याचा जरांगेंचा इशारा

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलनं आणि उपोषण केलं जात आहे. मात्र सरकार अजूनही मराठा आरक्षणाबाबत कोणतंही ठोस पाऊल उचलत नसल्याचा दावा मराठा आंदोलक करत आहेत. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देता येणार नाही, असे वक्तव्य केलं होतं. यानंतर ते म्हणाले होते की, मी आधीही जरांगेंना सांगितलं होतं, ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. यावर आता मनोज जरांगेंनी (Manoj Jarange-Patil) महाजनांना आश्वसानांचे कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आंदोलन आणि उपोषण करत आहे. आता मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे कडाडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा बांधव कधीच एकत्र येत नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता गर्दी पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. यामुळे आता गिरीश महाजनांनी विचार करावा आणि नंतर वक्तव्यं करावीत. त्यांनी आपल्याला वेळ मागितला होता. आपण त्यांना वेळ दिला असून त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अन्यथा आम्ही आश्वासनाच्या क्लिप व्हायरल करू, असे वक्तव्य जरांगेंनी केलं आहे.

हे ही वाचा

बारामती मतदारसंघात अजित पवारांचा उमेद्वार की सुप्रिया सुळे? बारामतीकर कन्फ्यूज

‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही’

‘मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चार लाख बेरोजगारांची नोंद’

(२१ डिसेंबर) दिवशी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आणि मराठा बांधव बैठक घेणार आहेत. यावेळी सरकरने मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अनेक दिवसांपासून सरकारला गुन्हे मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली होती, मात्र अजूनही गुन्हे मागे घेत नाही असा दावा जरांगेंनी केला आहे. सरकारने आपल्या अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा, असे वक्तव्य मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे. यानंतर त्यांनी मराठा समाजातील सर्व आमदारांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

मराठा आमदारांनी एकत्र येण्याचं आवाहन

मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी मराठा आमदारांना एकत्र येण्यासाठी आवाहन दिलं आहे. ६ डिसेंबर दिवशी अनेक मराठा आमदारांनी एकत्र येऊन आरक्षणाची प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा,असे आवाहन केलं आहे. दरम्यान आज (४ डिसेंबर) दिवशी जरांगेंची संध्याकाळी ५ वाजता  खामगावात सभा होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी