30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयतेलंगणात विमानाचा अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणात विमानाचा अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणामध्ये एक दुखद घटना घडली आहे. भारतीय हवाई दलाचे (IAF) ट्रेनर विमानाचा (IAF Trainer Aircraft) अपघात झाल्याची ही घटना आता समोर आली आहे. यामुळे आता देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये दोन ट्रेनी चालक होते. ही घटना तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्यात घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावेळी विमानात एक ट्रेनी पायलट आणि दुसरा ट्रेनर पायलट होते. अशातच दोन्ही पायलटचा अपघातात मृत्यू झाला असून अपघात झालेले शिकाऊ विमान होते. ही घटना सोमवार (४ डिसेंबर) दिवशी घडली आहे.

तेलंगणाच्या हैद्राबाद येथे सकाळच्या सुमारास विमान अपघाताची माहिती समोर आली. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. देशात शोक व्यक्त केला जात असून दुख:द घटना समोर आली आहे. ही माहिती स्वत: हवाईदलाने सांगितली आहे. सकाळी ९ च्या सुमारास दिंडीगुल येथे वायुसेना अकादमीमध्ये पिलाटस प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला आहे, याबाबतची माहिती ही वायुसेनेनं दिली आहे.

हे ही वाचा

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर कॉल रोकॉर्ड व्हायरल करण्याचा जरांगेंचा इशारा

बारामती मतदारसंघात अजित पवारांचा उमेद्वार की सुप्रिया सुळे? बारामतीकर कन्फ्यूज

‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही’

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा शोक

मिळालेल्या माहितीनुसार दोघांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी एक हे विमान प्रशिक्षण घेत होते म्हणजेच ट्रेनी होते आणि दुसरे हे हवाई दलाचे कॅडेट होते. पिलाटस पीसी ७ एमके २ असे त्या विमानेचे नाव होते. याबाबत आता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला असून ही माहिती ट्विटर x अकाऊंटवर शेअर केली आहे. विमान अपघाताची माहिती समजताच अत्यंत वाईट झालं. आपल्या दोन हवाई दलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. हा अपघात कसा झाला याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या माध्यमातून विमान अपघाताची माहिती काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी