30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयशिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर? ठाकरेंचा शिवाजी पार्कवर

शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर? ठाकरेंचा शिवाजी पार्कवर

दसरा मेळावा सभेसाठी वर्षभरापूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गटात हमारा तुमरी पाहायला मिळाली होती. गेल्या वर्षी शिवाजीपार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात सभा घेण्यापासून वाद सुरु होता. तेव्हा शिंदे गटाला बिकेसी’च्या मैदानावर दसरा मेळावा सभेसाठी परवानगी मिळाली होती. तर या सभेसाठी उद्धव ठाकरे यांनी दरवर्षीप्रमाणे शिवाजीपार्कात दसरा मेळाव्याची सभा घेतली. यंदा देखील दसरा मेळावा हा शिवाजीपार्कवर होईल असे उद्धव ठाकरेंनी ट्विट करत माहिती दिली आहे. मात्र यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत अजूनही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यंदाचा शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होईल? याबाबत माहिती शिंदे गटाच्या नेत्याने दिली आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा मानला जातो. दसरा मेळाव्यापूर्वी राज्यभरात दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे काय बोलतील? कोणते विचार मांडतील याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेले असायचे. मात्र मागील वर्षांपासून एकनाथ शिंदेंनी भाजपशी युती केली आणि सत्ता स्थापन केली. यामुळे दोन्ही गटात शिवाजीपार्क मैदानावर सभा कोण घेईल? यावरून वाद सुरु होता. मात्र यंदा आता शिंदे गटाने शिवाजीपार्कवर सभा न घेण्याची माहिती सांगितली आहे. ही माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांनी दिली. पालिकेने दिलेल्या निर्णयामुळे यंदाची सभा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात येईल असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

हेही वाचा

अजित पवारांच्या पत्राला शरद पवारांचे उत्तर

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरप्रकरणी पडला हरकतीचा पाऊस

समीर भुजबळांचा ‘मनाचा मोठेपणा’

काय म्हणाले दिपक केसरकर?

सावंतवाडीच्या पत्रकार परिषदेत असताना त्यांनी यंदाच्या दसरा मेळावा सभेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा हा आम्ही शिवाजीपार्क या मैदानावर करणार नाही. आम्हाला वादात पडायचे नाही. आम्ही यासाठी दुसरे मैदान निवडले आहे. दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हेल या मैदानावर यंदाचा दसरा मेळावा घेण्यात येईल. ठाकरे गट हा स्वतः राजकारण करतो. स्वतःची प्रसिद्धी करतो. आम्ही विकासाचे राजकारण करतो. हे आता जनतेने ओळखावे. अशी महिती दीपक केसरकरांनी दिली.

पालिका संभ्रमात

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केले होते. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनानं तत्काळ निर्णय घेण्याचं टाळलं. पहिला अर्ज कोणाचा आला त्याबाबत दोन्ही गटांनी गुप्तता पाळली आहे. मात्र आता पालिका हि जागा मेळाव्यासाठी कोणाला द्यायची याच संभ्रमात आहे. मात्र अजूनही पालिकेने अधिकृतरीत्या स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे पालिकेचा अजूनही निर्णय समोर आला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी