28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयइंडिया आघाडित बिघाडी?; ममता बॅनर्जींचा बैठकीला नकार, नितीशकुमार आजारी

इंडिया आघाडित बिघाडी?; ममता बॅनर्जींचा बैठकीला नकार, नितीशकुमार आजारी

राज्यात आगामी निवडणुकांमुळे आता सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचं पारडं जड असल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्रात भाजपला आपले वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. तर इतरही राज्यात भाजपला सत्ता हवी आहे. झालेल्या पाच निवडणुकांनंतर (Assembly Election) भाजपशी दोन हात करण्यासाठी ६ डिसेंबर दिवशी मल्लिकार्जुन खरगेंच्या (mallikarjun Kharge) निवासस्थानी इंडिया आघाडीच्या (India Aghadi) बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नकार दिला आहे. यामुळे आता इंडिया आघाडीत बिघाडी होणार का? अशा चर्चा सुरू आहेत. मात्र  शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे हे बैठकीला हजर राहतील, अशी माहिती खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिली आहे.

इंडिया आघाडीची बैठक ही काही मल्लिका खरगेंच्या निवासस्थानी घेण्यात येणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार आहेत. त्याचप्रमाणे ही बैठक आगामी निवडणुकांबाबत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नसल्याची महिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे नितीशकुमारही आजारी आहेत. तर आखिलेश यादव हे नाराज असल्याने इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, नेमके कोणते मतभेद आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. कॉंग्रेसने काय करावं यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरे दिल्लीत येतील आणि थेट बैठकीला रवाना होतील.

हे ही वाचा

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाची कार्यवाही सुरू

‘ममता चोर’ नावाचे टी-शर्ट घालत भाजप नेत्यांची निदर्शने

धनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट

दरम्यान माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यात गेले असता यंदा मुख्यमंत्री कोण हवा? असा प्रश्न ठाणेकरांना विचारला असता, यावर लोकांनी देवेंद्र फडणवीस असं नाव घेतलं होतं, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? याबाबत मी काय सांगणार? याचं उत्तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे देतील, हे लग्न तिघांमध्ये झालं आहे. यामुळे तिघांमध्ये झालेलं लग्न कधी टीकत नाही, असे वक्तव्य आता संजय राऊत यांनी केलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी