33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे तब्बल १७ वर्षांनंतर आभार

एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे तब्बल १७ वर्षांनंतर आभार

टीम लय भारी

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाथरीचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे यांना तब्बल १७ वर्षांनंतर मंत्री जयंतराव पाटील यांचे आभार मानण्याची संधी मिळाली आहे (Eknath Shinde thanked Minister Jayant Patil after 17 years).

गुंठेवारीबद्दल मंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्वाच विधान, म्हणाले…

कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; जयंत पाटील म्हणतात, “हा तर देशातील शेतकऱ्यांना…”

परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पाथरी येथील आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी २००४ साली पाथरी पंचायत समितीचे सभापती असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री असताना जयंतरावांकडे सभापतींना वाढीव मानधन मिळावे तसेच वाहतुकीसाठी वाहन मिळावे अशी मागणी एका कार्यक्रमात केली होती असा किस्सा सांगितला. तेव्हा जयंतराव पाटील यांनी ती मागणी तात्काळ मान्य करत सभापतींचे मानधन ३ हजारांवरून १२ हजार इतके करण्याची घोषणा केलीच शिवाय जयंतराव पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या गोष्टीला १७ वर्षे उलटली असून आज जयंतराव पाटील पाथरीत आले असता पाथरीचे तालुकाध्यक्ष या नात्याने एकनाथ शिंदे यांना आढावा बैठकीनिमित्ताने बोलण्याची संधी मिळाली आणि १७ वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांनी मंत्री जयंतराव पाटील यांचे आभार मानले (Eknath Shinde thanked Minister Jayantrao Patil for the decision taken 17 years ago).

बाळासाहेब थोरातांनी सांगितली विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडेंची आठवण

Handle complaints from women with sensitivity, Eknath Shinde tells police

दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी जयंतराव पाटील मोठे कष्ट घेत आहेत. पाथरीचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी आपल्या तालुक्यात ८० टक्के बुथ कमिट्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कारही यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी