29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांनी सांगितली विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडेंची आठवण

बाळासाहेब थोरातांनी सांगितली विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडेंची आठवण

टीम लय भारी

वर्धा : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या माजी उपाध्यक्ष प्रमोदबाबू शेंडेंच्या यांची एक गोड आठवण सांगितली आहे. प्रमोदबाबू शेंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी ते वर्धा येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही आठवण सांगितली (Balasaheb Thorat recalls Pramodbabu Shende).

प्रमोदबाबू जेव्हा आमदार होते, त्यावेळी तेव्हा त्यांची मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची पद्धत सुद्धा सगळ्यांपेक्षा वेगळी होती. मुख्यमंत्र्यांशी बोलताना ते अशा पद्धतीने बोलायचे की आपले काम झालेच पाहिजे या दृष्टीने ते बोलायचे. ते नेहमी सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून आग्रही असायचे. असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

खोटे रडणाऱ्या चित्रा वाघ, ताईगिरी भाईगिरी आम्हाला शिकवू नका : किशोरी पेडणेकर

तापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच

त्याचबरोबर विदर्भातील प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठी ते मला धाक दाखवायचे की हे काम झालेच पाहिजे. त्या वेळी मी कृषी मंत्री होतो, असे थोरात म्हणाले. या वेळी बाळासाहेबांनी लाल्याची गोष्ट सांगितली होती.

‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २

Congress leaders Balasaheb Thorat, Nana Patole urge Devendra Fadnavis for an unopposed Rajya Sabha bypoll

ज्यावेळी थोरात हे कृषी मंत्री होते, त्यावेळी कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी बीपी नावाचे बियाणं आले होते. परंतु त्या वर्षी कपाशीची पाने लाल पडली होती. हा प्रश्न विधान परिषदेत नेण्यात आला होता, त्यावेळी अध्यक्षांच्या जागी प्रमोदबाबू शेंडे होते. प्रमोद बाबू यांनी कसे त्यावेळी ही समस्यांवर भाष्य केले व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून अनुदान मिळवून दिले. ही आठवण थोरात यांनी सांगितली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी