32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीय'ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू...

‘ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते’ – संजय राऊत

टीम लय भारी

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग  यांना खोचक टोला लगावला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून  सत्ता स्थापित करू इच्छिते. असा टोला राउतांनी राज्यपालांना लगावला. ते दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते (He was interacting with the media in Delhi).

महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यदरम्यान ते एका वसतिगृहाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेणार आहेत.

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

सरकारी प्रताप, खोट्या स्वाक्षऱ्या करून हडपला निधी

राज्यपालांच्या या दौऱ्यांवर संजय राऊत म्हणतात, जिथे भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते. तुम्ही पहातच आहात पश्चिम बंगाल आणि दिल्लीत सध्या काय सुरू आहे. महाराष्ट्रातही हेच सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर, महाराष्ट्राचे राज्यपाल दुडूदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागून पडाल एके दिवशी अशी टीका राऊत यांनी केली (Raut made this remark one day).

He was interacting with the media in Delhi
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि संजय राऊत

गोल्ड हुकले, सिल्वर वर मानावे लागले समाधान

Rahul Gandhi likely to visit Maharashtra, has shown interest in Bal Thackeray’s work: Sanjay Raut

या आधी ही संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला होता. राज्यातील राजभवन हे राज्य आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी असते. सरकाचे पाय खेचण्यासाठी नाही. असे केले तर तुमचाच पाय गुंतून अडकेल तुम्हीच पडण्याची शक्यता अधिक आहे. असे राऊत म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी