33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडेंचा महत्वाचा निर्णय, तृतीयपंथियांची नोंदणी करणार

धनंजय मुंडेंचा महत्वाचा निर्णय, तृतीयपंथियांची नोंदणी करणार

टीम लय भारी

मुंबई: तृतीयपंथी घटकांची नोंदणी विभागीय स्तरावरून नोंदणीकृत संस्थाच्या मार्फत तातडीने सुरू करून तीन महिन्यात पूर्ण करावी व त्यांना घरे उपलब्ध करण्याबाबत जागेची पाहणी करावी अशा सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्त आणि संघटनांना दिल्या आहेत (Dhananjay Munde has made an important decision).

महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यासाठी तृतीयपंथीयांची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध व्हावी यासाठी या घटकांनी पुढे येऊन नोंदणी करावी. ही नोंदणी प्रक्रिया तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांच्या मार्फत विभागीय स्तरावरून तातडीने सुरू करावी व विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्त आणि संघटनांना दिल्या आहेत.

सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर डागली तोफ

ठाकरे सरकारकडून बदल्यांचा बाजार, कायदा बसविला धाब्यावर; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे यांच्यासह विविध भागातील तृतीयपंथीय संघटनांचे पदाधिकारी इतर मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

Dhananjay Munde has made an important decision
धनंजय मुंडें

धनंजय मुंडे म्हणाले, राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी महामंडळ स्थापन केले आहे. राज्यातील तृतीयपंथीयांसाठी मंडळामार्फत योजना राबविण्यासाठी आकडेवारी शासनाकडे असणे आवश्यक आहे. यासाठी तृतीयपंथीयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी. ही आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर योजना राबविता येईल. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर सामाजिक संघटनांची नेमणूक करुन या प्रक्रियेत संघटनांच्या सूचनांचाही समावेश करावा (Dhananjay Munde said the scheme could be implemented once the figures are received).

मंत्री दत्तात्रय भरणेंची जादू, MPSC च्या फाईलवर राज्यपालांची दोन तासांतच स्वाक्षरी

Mumbai: NCP leader gets ‘Mumbai Ratna’ award from governor, resolves to do more for poor, needy

येत्या तीन महिन्यात ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच तृतीयपंथीयांसाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या चार ठिकाणी घरे उपलब्ध करण्याबाबत जागेची पाहणी करुन तसा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचनाही मुंडे यांनी यावेळी दिल्या आहेत (Dhananjay Munde said plans should be made to complete the registration process in the next three months).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी