31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयदेशात चाललंय तरी काय... महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात सुद्धा बंडाची तयारी?

देशात चाललंय तरी काय… महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात सुद्धा बंडाची तयारी?

टीम लय भारी

गोवा : महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आता गोव्यातील काॅंग्रेसपक्षामध्ये सुद्धा बंडाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गोव्यातील काॅंग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपास गेला आहे, त्यामुळे काॅंग्रेसच्या 11 आमदारांपैकी 9 जण भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाराज आमदारांची पक्षाकडून मनधरणी करण्यात येत असून त्यांना थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेषतः काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गोव्यात काॅंग्रेसचे केवळ 11 आमदार आहेत, त्यापैकी 9 जण भाजपच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे 9 आमदार जर भाजपमध्ये गेलेच तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकत नाही कारण त्यांची संख्या मोठी आहे.

दिगंबर कामत, मायकल लोबो, युरी आलेमाओ, संकल्प आमोणकर, डेलाला लोबो, अॅलेक्स सिक्कारो, केदार नायक आणि राजेश फळदेसाई काँग्रेसमधील हे आमदार पक्षाविरूद्ध बंड पुकारून भाजपशी हात मिळवू शकतात अशी माहिती सध्या समोर येत आहे.

या आमदारांची मनधरणी सुरू आहे, त्यामुळे हे 9 आमदार आपल्याच भूमिकेवर ठाम राहणार की काॅंग्रेस पक्षाशी असलेली आपली एकनिष्ठता कायम ठेवणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेना बंडानंतर इतर राज्यांत सुद्धा इतर पक्षांतील खदखद समोर येत असून नेतेमंडळींमध्येच बंडाची मोठी आग भडकल्याची दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने तलावात कोसळली कार

मुंबईच्या सौंदर्यावर डांबराचे गोळे आणि कचऱ्याच्या ढिगांचे तीट

नदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी