29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईमुंबईच्या सौंदर्यावर डांबराचे गोळे आणि कचऱ्याच्या ढिगांचे तीट

मुंबईच्या सौंदर्यावर डांबराचे गोळे आणि कचऱ्याच्या ढिगांचे तीट

टीम लय भारी 

मुंबई : मुंबई शहराला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभल्याने हे सौंदर्य नेहमीच सगळ्यांना खुणावत असते, परंतु ते सौंदर्य पाहताना प्लास्टिक किंवा इतर तत्सम गोष्टी अनावधानाने तिथेच फेकल्यामुळे घाणीचे साम्राज्य सहज दिसू लागते. मुंबईतील जुहू बीच वर सुद्धा असेच काहीसे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात डांबराच्या गोळ्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे, शिवाय प्लास्टिक, इतर कचरा सुद्धा विखूरलेला दिसत आहे.

जूहू बीचवर डांबराच्या गोळ्यांचा मोठा खच पडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर कच्च्या तेलाच्या गळतीमुळे हे डांबराचे गोळे तयार झाले असावेत असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शहरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे समुद्रातील इतर कचरा सुद्धा किनाऱ्यावर पुन्हा फेकला गेला आहे.

दरम्यान, डांबराचे गोळे अनेक वेळेस समुद्रकिनारी दिसतात, परंतु या गोळ्यांमुळे केवळ समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यच नष्ट होत नाही तर खेकडे आणि इतर उभयचर प्राण्यांच्या जीवीतास सुद्धा धोका निर्माण होते, त्यांच्या प्रजननास अडथळा निर्माण होतो असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान – सुप्रिया सुळे

नदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव

ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी