30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रनदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव

नदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव

टीम लय भारी

नंदूरबार : नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी गावात शासकीय आश्रम शाळेच्या परिसरात नदीच्या पुराचे पाणी शिरले आणि एकच गोंधळ उडाला, विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिकांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले असून मुलांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने राज्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वडफळी या गावात देवनदीला मोठा पूर आला आहे. पुरामुळे आजूबाजूच्या वस्तींमध्ये पाणी शिरले असून गावातील शासकीय आश्रम शाळेचा परिसर सुदधा पाण्याने वेढला गेला आहे.

अचानक पाणी परिसरात शिरल्यामुळे शाळेतील मुले घाबरून गेली, मदतीसाठी वाट पाहत होती. वाढत्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ स्थानिकांकडून शाळेतील मुलांना दोरीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, देवनदीला मोठा पूर आल्याने गावातील परिसर जलमय होऊ लागला आहे. घरांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. अनेकांच्या घरांचे, घरातील सामानांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीसोबत इतर नाले सुद्धा दुथडी भरून वाहू लागले आहेत, त्यामुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यांत काही भागांत  मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने देव नदीला मोठा पूर आला आहे. महाराष्ट्र – गुजरात सीमेवर वसलेल्या गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल

शिंदेसेनेची ताकद वाढली! परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेनेतून ‘आऊट’

सातारा पोलीस अधिक्षकांचे ‘मायणी’ला झुकते माप, ‘छावणी’वर मात्र अन्याय, शिवसेनेचा आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी