31 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयनारी शक्ति तुझे सलाम: 'आमदार आई' अहिरेंपाठोपाठ आता नमिता मुंदडाही तान्हुल्यासह कर्तव्यास...

नारी शक्ति तुझे सलाम: ‘आमदार आई’ अहिरेंपाठोपाठ आता नमिता मुंदडाही तान्हुल्यासह कर्तव्यास सज्ज..!

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या जोरात सुरू आहे. या अधिवेशनामध्ये चर्चेचा विषय ठरल्या त्या म्हणजे आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आमदार सरोज अहिरे. त्यांच्यानंतर आता आणखी एक आमदार चर्चेचा विषय ठरत आहेत. अहिरेंच्या नंतर भाजपा आमदार नमिता मुंदडा (MLA Namita Mundada) याही आपल्या दोन महिन्यांच्या लेकीसह विधिमंडळ कामकाजात सहभागी झाल्या. त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. तसंच त्या चर्चेचा विषय ठरत आहेत. खरं तर प्रत्येक महिलेसाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे.

आज जागतिक महिला दिन असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. क्रीडा असो वा उद्योग, गृहिणी असो वा राजकारणी या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा समावेश लक्षणीय आहे. त्यात एकाचवेळी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या या महिला आमदारांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. (International Womens Day)

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात आल्या होत्या. त्यावेळी तिथल्या हिरकणी कक्षाची दुरावस्था त्यांनी दाखवून दिली होती. त्यानंतर तिथल्या हिरकणी कक्षामध्ये तात्काळ सुधारणा करण्यात आल्या. अहिरे यांच्या पाठोपाठ आता भाजपा आमदार नमिता मुंदडा याही आपल्या दोन महिन्यांच्या लेकीसह विधानभवनात आल्या आहेत.

विधानभवनात हिरकणी कक्ष उभारला हे सकारात्मक पाऊल आहे. त्याचसोबत महिला दिनानिमित्त सगळ्या लक्षवेधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला त्याचा आनंद आहे. ही परंपरा यापुढेही चालूच राहू दे. प्रत्येक अधिवेशनात महिलांसाठी १-२ दिवस राखीव ठेवण्यात यावा. हिरकणी कक्ष यावा यासाठी सातत्याने मी पाठपुरावा केला. अनेक महिला आमदारांसाठी हा उपयुक्त कक्ष आहे असं आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या.

नमिता मुंदडा या बीडच्या आमदार आहेत. पूर्वी त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी त्यांची पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर लगेचच मुंदडा यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सासूबाई विमल मुंदडा या राष्ट्रवादीमध्ये असून त्या राज्याच्या माजी मंत्री होत्या.

हे सुद्धा वाचा : 

विधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार आईला रडू कोसळले…

कर्तव्यतत्पर आमदार मातेच्या तक्रारीची खुद्द आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल!

महिला दिन विशेष : स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या तेव्हा…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी