26 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeराजकीयजयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

टीम लय भारी

लातूर :- आज लातूर जिल्ह्यात देशातील पहिले ऑटिजम सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यात जयंतराव पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केले (Jayantrao Patil praised Social Justice Minister Dhananjay Munde).

स्वमग्नता व तत्सम आजारांवर योग्य वेळेत उपाचार होणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऑटिजम सेंटर उभारण्यात आले आहे. हे देशातील पहिले ऑटिजम सेंटर असणार आहे. या सेंटरचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केले.

Jayant Patil praised Dhananjay Munde
जयंत पाटील आणि धनंजय मुंडे

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, की सामाजिक न्याय विभागाची जवाबदारी धनंजय मुंडे यांच्या हाती आहे, याचा मला आनंद होत आहे. त्यांच्या या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लोकांना खूप लाभ होणार आहे. असे म्हणत जयंतराव पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या ऑटिजम सेंटर उपक्रमाचे कौतुक केले (Jayantrao Patil lauded Dhananjay Munde’s Autism Center initiative).

यानंतर, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, ऑटिजम सेंटरमध्ये स्वमग्नता व तत्सम आजारांवर मोफत उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. हा आजार कायमस्वरूपी नाही यावर योग्य वेळी, योग्य उपाचार केल्यास या आजारांवर मात करू शकतो. यासाठी लातूरमध्येच नाहीत. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटिजम सेंटर उभारण्याचे  माझे ध्येय आहे. उपक्रमासाठी खूप लोकांनी मला साथ दिली आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सिद्धिविनायक प्रतिष्ठान यासर्वांचे मी कौतुक करतो (I appreciate the Social Welfare Department, Zilla Parishad, Siddhivinayak Pratishthan).

Jayant Patil praised Dhananjay Munde
जयंत पाटील आणि धनंजय मुंडे

‘कोरोना’ची लस घेणाऱ्यांना जडतोय नवा आजार

Maha: New facility in Latur offers ray of hope for autistic children and their parents

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लहान मुलांची शाळा बंद असून स्वमग्नता तसेच मोबाईलच्या अतिरेकामुळे अन्य मानसिक आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पथदर्शी असून, संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा प्रयोग करण्याचा मानस आहे. असे धनंजय मुंडे म्हणाले.

या ऑटिजम सेंटरमध्ये  अर्थात स्वमग्नता, बहुविकलांगता, सेलेवर पल्स, बुध्यांक मापन, अति चंचलपणा, या सारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग असलेल्या बालकांना थेरपी देण्यासाठी सर्व अद्ययावत उपकरणे व तज्ञ व्यक्ती उपलब्ध आहेत.

स्वमग्नता आजार म्हणेज काय?

स्वमग्नता हा एक प्रकारचा ‘मनोविकार’ आजार आहे. या आजाराला सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर (Psychoneurological developmental disorders) असे म्हणतात.

इंग्रजीत याला ‘ऑटिजम’ असा दुसरा शब्द आहे. यात मुलांमध्ये एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती निर्माण होते. स्वमग्नता ही जन्मस्थ अवस्था आहे. स्वमग्नता हा कोणताही रोग नाही. ऑटिजम होण्याचे काही एक कारण नाही. संशोधनानुसार ऑटिजम होण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की, मस्तिष्कच्या कार्यवाहीत असामान्यता होने,  मस्तिष्कच्या रसायनमध्ये असामान्यता, जन्मा अगोदर बाळाचे विकास व्यवस्थित न होने इत्यादी कारण असू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी