28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीयनितीश कुमारांचे आता महाराष्ट्रात लक्ष्य; JDU चा मुंबईत संवाद मेळावा

नितीश कुमारांचे आता महाराष्ट्रात लक्ष्य; JDU चा मुंबईत संवाद मेळावा

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात प्रखर भूमिका घेणाऱ्या जद(यू.) ने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत संवाद मेळावा आयोजित केला आहे. यावेळी कर्नाटकसह देशातील राजकीय बाबींवर चर्चा होणार आहे. कर्नाटक राज्यात जनता दल (से) या पक्षाने निवडणुकीत भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील या पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी नाराज आहे. या पार्श्वभूमीवर जद(यू.)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह रविवार,(दि.1ऑक्टोबर) रोजी मुंबईत येत आहेत. त्यांच्यासोबत बिहार सरकारचे जलसंधारणमंत्री संजय कुमार झा असणार आहेत. कर्नाटकातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील काही समाजवादी नेते मुंबईत येत असून ललन सिंह यांची ते भेट घेणार आहेत. यावेळी देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रविवारी संध्याकाळी 5 वा. अ. भि. गोरेगावकर शाळेचा हॉल, आरे रोड, गोरेगाव (प.) येथे जनता दल (यूनाइटेड) चा संवाद मेळावा आयोजित केला आहे. त्यात राष्ट्रीय अध्यक्षांचे भाषण होईल. यावेळी ‘मुंबईकर’ असलेले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांचा सत्कार होणार आहे. जद(यू.) राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील, प्रदेश अध्यक्ष शशांक राव, प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जद(यू.) चे राज्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा
राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मराठी अस्मितेला हात, ठिगळ लावलेली अस्मिता नकोच…
21 दिवसांनंतर ओबीसींचं उपोषण मागे, फडणवीसांची शिष्टाई यशस्वी
मराठा आरक्षणाच्या वाटेत अडचणींचे काटे, १ कोटी दस्तऐवजांत केवळ पाच हजार कुणबी नोंदी

कर्नाटकातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील काही समाजवादी नेते मुंबईत येत असून, जद(यू.) चे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांची भेट ते घेणार आहेत. तत्पूर्वी संध्याकाळी 4 वा. केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथील मृणालताई गोरे यांच्या स्मृती दालनाला ललन सिंह आणि मान्यवर भेट देणार आहेत. अशी माहिती जद(यू.) मुंबई अध्यक्ष अमित झा, राजा कांदळकर, संघटक सचिव, जद(यू.) यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी