34 C
Mumbai
Tuesday, May 23, 2023
घरराजकीयचोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. या चोरलेल्या धनुष्य बाणासोबत निवडणुकीला सामोरे या, असे थेट आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ते म्हणाले, “आज शिवरात्र आहे. मात्र, आपले शिवधनुष्य चोरीला गेले आहे. या चोरांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू.” (uddhav thakre challanged to dknath shinde)

मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग जनता कुणाला निवडते ते पाहू, असे खुले आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे, अशी टीका त्यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावरही दावा सांगितला होता. त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाने आपण खचून गेलो नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेतून दिसत आहे. या निर्णयाचे पडसाद काय उमटतात ते येणार काळच सांगेल.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंनी ओळखले ‘जबाबदारीचे भान’

पंतप्रधानांनी आता जाहीर करावे, लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे : उद्धव ठाकरे

पक्ष गेले, चिन्ह गेले..! आता शिवसेना भवनासाठी होणार ‘सामना’? सविस्तर वाचा

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी