33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयआमच्या विजयात नरेंद्र मोदींचा 50 टक्क्यांचा वाटा; कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची प्रतिक्रीया

आमच्या विजयात नरेंद्र मोदींचा 50 टक्क्यांचा वाटा; कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची प्रतिक्रीया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विजयात भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांचा 50% वाटा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी दिली आहे. ते म्हणाले, “मोदींनी कर्नाटक प्रचारात पंतप्रधान पदाला न शोभणारी बेताल आणि असभ्य बडबड केली. त्यांनी जितके ताळतंत्र सोडले, जितकी तिरस्कारची आणि धार्मिक विद्वेषाची भाषा केली तितका काँग्रेसला फायदा झाला.

पवन खेरा म्हाणाले, जनतेला आता पंतप्रधानांच्या वाचाळपणाचा उबग आला आहे. आम्ही मात्र नफरतभऱ्या प्रचाराला प्रेमाने उत्तर दिले. पंतप्रधानांची भाषा माणसे, समाज, देश तोडणारी असताना राहुल गांधींनी मात्र जोडण्याची भाषा केली. जनतेला ती भावली. म्हणूनच काँग्रेसच्या यशात कार्यकर्त्यांचा 50% आणि मोदींचा 50% वाटा आहे.”

कर्नाटकमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताचे सरकार बनवत आहे. कर्नाटकच्या निकालातीन जनतेने नकारात्मक प्रचाराला तिलांजली दिल्याचे पवन खेरा यांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्ये भाजपला मोठा झटका बसला असून याला मोदींचा नकारात्मक प्रचार कारणूभूत ठरल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा
शरद पवार तयारीला लागले; कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीची बोलविली बैठक

कर्नाटक : 12 पैकी आठव्या फेरीअखेर काँग्रेस 119; स्पष्ट बहुमत!

एलन मस्क ट्विटरचे सीईओपद या महिलेकडे सोपविणार !  

त्यामुळेच काँग्रेसला या निवडणुकीत फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीचे असे निकाल रातोरात येत नाहीत. याची सुरुवात भारत जोडो यात्रेपासूनच झाली होती. तसेच आमचा 5 गॅरंटी कार्डचा जाहीरनामा देखील फायदा झाला. पंतप्रधान मोदी यांना बजरंगबलीच्या भक्तांनी जोरदार झटका दिल्याचे पवन खेरा म्हणाले. मतदारांनी मोदींचे नॅरेटिव्ह स्पष्टपणे नाकारल्याचे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी