31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयपाकिस्तान ही सांगेल शिवसेना कोणाची, पण निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला : उद्धव...

पाकिस्तान ही सांगेल शिवसेना कोणाची, पण निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला : उद्धव ठाकरे

पाकिस्तानला विचारलं तर पाकिस्तान ही सांगेल शिवसेना कोणाची, पण निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आपले सरकार असताना चक्रीवादळ, कोरोना अशी संकटे होती, आमच्या सरकारने मदत केली, हे उलट्या पायाचे सरकार, हे सरकार अवकाळी सरकार आहे. एका तरी संकटकाळात सरकारने मदत केली का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकरी मेला तर कुणाच्या घरात अन्नधान्य येणार नाही. अनाथाच्या नाथा झाल्या असतील वाऱ्या तर ये आता माझ्या बांधावरी अशा शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत.  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज (रविवार, दि.२३) रोजी सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते पाचोऱ्यात उपस्थित आहेत.

बहिनाबाई म्हणायच्या इमानाला विसरला त्याला नेक म्हणू नये, जो बापाला विसरला तेला लेक म्हणू नये, पाठीवर सोडाच पण आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आमची असूच शकत नाही अशी टीका ठाकरे यांनी केली. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते, ढेकणं मारायला एक बोट देखील चिरडूण टाकू शकतं. ठाकरे म्हणाले, आव्हानांची भाषा आम्हाला देखील येते, भाजप आव्हान नाही, पण देशात जो पर्यंत भाजप सत्तेत असेल तो पर्यंत जे नुकसान करेल ते कसे भरुन काढायचे हे आव्हान माझ्यासमोर आहे.

काल परवा बातमी आली हिंदूस्थान लोकसंख्येच्या बाबतीत नंबर एक, तरुण मुले आत्महत्या हरत असतील तर या लोकसंख्येचे करायचे काय असा सवाल देखील त्यांनी केला. महागाई वाढत आहे, पण लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट केले का असा सवाल त्यांनी केला. सत्यपाल मलिक यांनी पुलवामाप्रकरणात सरकारची चुक असल्याचा गौप्यस्फोट केला. सत्यपाल मलिक यांच्यामागे सीबीआय मारले. काल परवा दोन तीन सैनिक शहिद झाले, पण मंत्री नेते कर्नाटकात ठाण मांडून आहेत. अमित शाह म्हणाले सत्यपाल मलिक सत्तेत असताना मलिक का बोलले नाहीत, तर मला त्यांना विचारायचे आहे, तूम्ही त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावता, ते जर तुमच्यात आल्यानंतर शुद्ध होत असतील तर आमच्यात असाताना भ्रष्ट असे सवाल देखील ठाकरे यांनी केला.

एकनाथ खडसे यांनी २०१४ साली सांगितले होते, आपली युती तुटते असे सांगितले होते. एकनाथ खडसे भाजपमध्ये होते, तेव्हा त्यांना युती तोडा असे सांगितले, त्यानंतर त्यांनी एकनाथ खडसे यांना देखील फेकुन दिले असा घणाघात ठाकरे यांनी केला. आपल्या पक्षातील नेते फेकुन द्यायची आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घ्यायचे हे कसे असा सवाल त्यांनी केले. आमचे नितीन देशमुख गुवाहाटीवरुन परत आले त्याच्यामागे चौकशा लावले, राजन साळवी, वैभव नाईक यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. किती जणांच्या मागे ससेमिरा लावणार एकदाच जेल भरो करुन टाका असे देखील ठाकरे म्हणाले. संजय राऊत, अनिल देशमुख यांना अटक केली, हसन मुश्रीफ यांच्यामागे चौकशी लावली.

माझ्यावर टीका केली, मी घरीबसून सरकार चालवले, पण मी घरी बसून जे करु शकलो, ते तुम्ही वणवण करुन करु शकला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मविआला तीन वर्षे झाली. तीन वर्षात एकतरी घटना सांगा मी हिंदूत्व सोडल्याचे सांगा मी स्टेज सोडून जातो असे ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर मी कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ दिला नाही. हिंदूत्व म्हणून ते जसे वागले तसे वागणार नाही, माझे हिंदू्त्व शेंडी जाणव्याचे नाही, आमचे हिंदूत्व राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे हिंदूत्व काय आहे, हेच त्यांना सांगता येत नाही असा घणाघात ठाकरे यांनी केला, आमचं हिंदूत्व पाशवी नाही असे देखील ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांचा देखील खरपूस समाचार घेतला, ते सभेत घुसणार? म्हणतात पण अशा घुशी आम्हीं खुप पाहिल्या आहेत. अशा घुशींच्या शेपट्या पकडून बिळातून बाहेर काढून आपटणार.

 

हे सुद्धा वाचा

‘टेलिग्राम’वर बंदी घाला, मराठी चित्रपट दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची मागणी

अमोल कोल्हे यांच्या ‘वाचाल तर वाचाल’मुळे सर्वांनाच टाकले बुचकळ्यात

राजीव गांधींसारखे मोदींना बॉम्बने उडवून देऊ; पंतप्रधानांना धमकीचे पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी