32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

टीम लय भारी

मुंबईतील क्रुझवर केलेल्या कारवाईत आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक चालू आहे. आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. या वादात आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे (Kirit Somaiya criticizes Thackeray government).

 “ठाकरे सरकारचे नेते ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते असल्यासारखं बोलत आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरूद्ध दुर्भावनापूर्ण जी मोहिम उघडलीय, त्याचा मी निषेध करतो, असं ट्विटद्वारे किरीट सोमय्या म्हणाले.

 ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही : किरीट सोमय्या

दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा समोर आणणार; किरीट सोमय्यांचा इशारा

समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्राची जनता या महाविकास आघाडीच्या माफियाला सोडणार नाही, असं देखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत. यामुळे राज्याचं वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. अशातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नवाब मलिक यांना संरक्षण देणार असल्याचं देखील सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका, म्हणून ‘झेड’ सुरक्षा, भाजपचा दावा

High drama at ED office as Kirit Somaiya submits documents against Pawar Ajit, kin

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी