30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला...

किरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचे एकमेकांवर आरोप करण्याचा प्रकरण काय थांबताना दीसत नाही. आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर १०० कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे.( Kirit Somaiya’s shocking allegation that Sanjay Raut )

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नोकरी मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने भागीदारी फर्म स्थापन केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी राऊत यांच्यावर केला. मुंबईच्या दहिसर वरळी NSCI महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड कोविड-केअर सेंटरमध्ये काम मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे.

हे सुद्धा वाचा

वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा? किरीट सोमय्यांचा राऊतांना टोला

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

किरीट सोमय्यांच्या सूड बुद्धीने माझ्यावर कारवाई, प्रताप सरनाईकांचा आरोप

BJP’s Kirit Somaiya dares MVA govt to book him for ‘violation’ of Official Secrets Act

याआधीही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन कंपनीत भागीदारी केल्याचा आरोप केला होता. राऊत यांची महाराष्ट्रातील बडे उद्योगपती अशोक गर्ग यांच्या मॅग्पी ग्लोबल लिमिटेड या वाईन कंपनीत भागीदारी असल्याचे सौम्या यांनी सांगितले होते. या व्यवसायात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी या कंपनीत संचालक पदावर आहेत. वाइन व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला संजय राऊत समर्थन देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

मात्र, किरीट सोमय्या यांच्या आरोपांना राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले होते, “किरीट सोमय्या यांची मुले हरभरा विकतात का? अमित शहांची मुले केळी विकतात? डान्सबार उघडून भाजप नेत्यांची मुले बसली आहेत? माझा काही वायनरी व्यवसाय असेल तर भाजप नेत्यांनी तो ताब्यात घेऊन चालवावा. माझ्या मुली एखाद्या कंपनीत डायरेक्टर असतील तर काय चुकले.त्या कोणत्याही भाजप नेत्याच्या मुलासारखा अंमली पदार्थांचा व्यवसाय तर करत नाही”. असा टोला लगावला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी