33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराजकीयअखेर पाच दिवसानंतर लाल वादळ शमलं..!

अखेर पाच दिवसानंतर लाल वादळ शमलं..!

राज्याच्या विविध भागातून नाशिकमध्ये एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा अखिल भारतीय किसान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. आज अखेर पाच दिवसानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या 70टक्के मागण्या पूर्ण होणार याची खात्री मिळाल्यानंतर हे लाल वादळ शमले आहे. (All India Kisan Sabha Morcha)

आज सकाळपासून आंदोलन (Farmers Protest) स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र बैठकीच्या झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत जेपी गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या किसान सभेच्या शिष्टामंडळाच्या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आता तोडगा निघाला आहे. यामुळे कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे.

विशेषतः नाशिक जिल्ह्यातील अनेक अधिकारी कार्यवाहीच्या कामाला लागले आहेत. आज सकाळी 9 वाजल्यापासून सरकारी कार्यवाही सुरू झालीय अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. प्रश्न समजून घेऊन अधिकारी तातडीने कारवाई करत आहे. याआधी मोर्चे निघाले परंतु सरकारने तात्काळ दखल घेऊन कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे, सरकारी आदेशाचे अंमलबजावणी सुरू आहे. ‘आमचे 70टक्के मागण्या पूर्ण झाल्याची खात्री मिळाल्यावर आज आम्ही शेतकरी लॉंग मार्च मागे घेतोय,’ अशी घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी केली. 

यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावित म्हणाले की, “आम्ही सतरा मागण्या केल्या होत्या, यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत.”

हे सुद्धा वाचा : 

पुन्हा एकदा मुंबईत लाल वादळ धडकणार; राज्यात शेतकरी आंदोलनाचा एल्गार

लाल वादळाची कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने वाटचाल

किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक; तोडगा न निघाल्यास मोर्चेकरी घेणार ‘हा’ निर्णय

दरम्यान, दिंडोरीहून निघालेल्या मोर्चाबाबत माध्यमांनी दखल घेतली. निघताना 5 हजार लोक होते. शेतकऱ्यांपर्यंत बातमी पोहचवली. आज आमच्या मोर्चाची ताकद 18 हजारांवर पोहचली. पहिल्यांदाच सरकारकडून निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणीला सुरूवात झाली त्याबद्दल मी सरकारचे आणि माध्यमांच्या प्रतिनिधीचे आभार मानतो असंही शेतकरी नेते आणि माजी आमदार जेपी गावित यांनी म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी