30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयहेच का ते अच्छे दिन: गॅस दरवाढीमुळे रणकंदन करणारे भाजपचे नेते आता...

हेच का ते अच्छे दिन: गॅस दरवाढीमुळे रणकंदन करणारे भाजपचे नेते आता गप्प का? राष्ट्रवादीचा खोचक सवाल

स्वयंपाकासाठी आवश्यक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीने दोन वर्षांत आकाश गाठले आहे. यामुळे गेल्या 24 महिन्यांत सततच्या चढ-उतारानंतर घरगुती गॅस सिलिंडर 90% तर व्यावसायिक 111% नी महागले आहे. या काळात घरगुती गॅसची किंमत 524 रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1094 रुपयांनी वाढली. भविष्यात किमती कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. या महागाईमुळे घरोघरीचे बजेट मात्र कोलमडले आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षात घरगुती गॅसच्या दरात 18 वेळा दरवाढ करण्यात आली तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात 27 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कुठे गेले ते अच्छे दिन, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीने (NCP) सरकारला केला आहे. एकेकाळी गॅस दरवाढीमुळे रणकंदन करणारे भाजपचे नेते (BJP) आता गॅस दरवाढ झाल्यावर गप्प का बसलेत? हेच का ते अच्छे दिन, असा सवाल राष्ट्रवादीकडून भाजप सत्ताधाऱ्यांना करण्यात आला आहे.

गॅस सिलेंडरचे दर अटोक्यात आणण्याचा प्रयत्न कुठेच झालेला दिसून आला नाही. विशेषतः मागच्या दोन वर्षात (1 मार्च 2020 ते 1 मार्च 2023 कालावधीत) घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत केवळ एकदाच घट झाली ती देखील केवळ 10 रुपयांची, असे राष्ट्रवादीने सूचित करून दिले आहे. (gas price hike)

1 मार्चपासून 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली. यामुळे फेब्रुवारीपर्यंत मुंबईत प्रति सिलिंडरची किंमत 1052.50 रुपयांवरून थेट 1102.50 रुपयांवर पोहोचली. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांची वाढ होऊन ती 1721 रुपयांवरून 2071.50 रुपयांवर पोहोचली. वरवर पाहता ही वाढ 50-70 रुपयांची दिसत असली तरी गेल्या दोन वर्षांत हळूहळू घरगुती गॅस 90% तर व्यावसायिक 111% महागल्याचे दिसत आहे. देशात सरकारी मालकीच्या इंडियन ऑइलचे इंडेन, भारत पेट्रोलियमचे भारत गॅस तर हिंदुस्तान पेट्रोलियमचे एचपी गॅस बाजारात आहेत. त्यामुळे एकंदरीत सामान्य माणूस अक्षरशः रडकुंडीला आला आहे.

हे सुद्धा वाचा :

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा

महायुतीला हरवण्यासाठी मविआ एकजुटीने निवडणूक लढवणार! जागावाटपाचे सूत्र हाती; काँग्रेसला सर्वात कमी जागा

शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही – भाजपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी