28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयअर्थसंकल्प 2022 वर महाविकास आघाडीतील नेत्यांची खोचक टीका

अर्थसंकल्प 2022 वर महाविकास आघाडीतील नेत्यांची खोचक टीका

टीम लय भारी

मुंबई:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23  सादर केला.  या अर्थसंकल्पात करदात्यांना सवलत किंवा सूट देण्यात आली नाही. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीच्या कामात प्रशिक्षण, सोयी आणि सुविधांची घोषणा केली आहे मात्र, सर्वसामान्य करदात्यांना कोणताही नव्याने दिलासा देणारी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाहीये.( Mahavikas Aghadi sharply criticize the budget 2022)

करचुकवेगिरी करणाऱ्यांवरही केंद्र सरकार कारवाई करणार असून सर्वच मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा

Verdict slap on Maha Vikas Aghadi government: BJP

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी केवळ एकच वाक्य लिहिलं आहे. ‘अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!’. एका वाक्यात आपली प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. येत्या काही दिवसांत या निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

गरीबांचा किती गळा आवळतात हे माहिती आहे. दोन चार उद्योगपती त्यांचे हात कुठे अजून वर जातात ते समजेल, भाजपचा बजेट हा आभास असतो. फसवे वातावरण तयार करत असतात. त्यामध्ये प्रत्यक्षात गरीबाला मध्यमवर्गीयांना काहीही मिळत नाही. असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची फसवणूक करणार आहे. एका हाताने द्यायचे दुसऱ्याचं घ्यायचे असा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी