31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजनितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. आता नितेश राणे हे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. उच्च न्यायालयात नितेश राणे आपला जामीन अर्ज दाखल करणार आहेत(Nitesh Rane’s car stopped by police, verbal clash between police and Rane).

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता(Nitesh Rane had applied for pre-arrest bail in a court in Sindhudurg).

मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली होती.

त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी तब्बल साडेपाच तास युक्तिवाद केला. न्यायमूर्तींनी जामिनाचा निकाल मंगळवारी दिला जाईल, असे सांगत सुनावणी तहकूब केली होती. ‘राणेंवर 353 च्या तीन केसेस आहेत. मालवण बांगडा फेक आंदोलन, इंजिनिअरच्या चेहऱ्याला काळे फासणे आणि डंपर आंदोलन या व्यतिरिक्त कोणतेही गुन्हे नाहीत, हे सर्व जनतेसाठी आंदोलन करताना झालेले गुन्हे आहेत, असा युक्तीवाद देसाई यांनी केला.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

अर्थसंकल्प 2022 वर महाविकास आघाडीतील नेत्यांची खोचक टीका

SC directs BJP MLA Nitesh Rane to surrender in attempt to murder case, grants 10-day protection from arrest

कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी