35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआमदार रोहित पवारांना आईच 'लय भारी' कौतुक!

आमदार रोहित पवारांना आईच ‘लय भारी’ कौतुक!

टीम लय भारी 

मुंबई :  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या मायलेकांमधील नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच भरभरुन बोललं जातं. रोहित पवार आपल्या ट्विटर आणि फेसबुकवरुन त्यांच्या आईच्या सामाजिक कार्याविषयी आदर व्यक्त करत असतात. जागतिक महिला दिना निमित्त KJIDF च्या वतीने जामखेडप्रमाणेच कर्जतमध्येही आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या आईच्या हस्ते अंगणवाडी सेविका,आशाताई, विविध क्षेत्रातील कर्तृत्त्ववान महिला आणि ‘समृद्ध गाव योजने’त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी या भगिनींशी सुनंदा पवार यांनी संवाद साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी याच कार्यक्रमा संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.आपल्या आईचं कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या अनेक उपक्रम रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातुन विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत.रोहित यांच्या आई सुनंदा पवार या महिलांसाठी बचतगटांची चळवळ चालवतात. कर्जत आणि जामखेड येथे होणाऱ्या प्रत्येक सामाजिक कार्यात त्या सहभागी होतं असतात.

सुनंदा पवार या बारामती अॅग्रीकल्चर डेव्हसलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्यांच्या विविध सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यात भरवली जाणारी भिमथडी जत्रा प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या भिमथडीच्या जत्रेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी रोहित स्वतः सांभाळत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी